आयपीएल २०२२च्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. Cricbuzzच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२२चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे. यावेळी १० संघ लिलावात सहभागी होतील, कारण लखनऊ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ आयपीएलमध्ये सामील झाले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी आयपीएल लिलावादरम्यान बोली लावली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबादसाठी १ डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – VIDEO : किती तो ब्रोमान्स..! कॅप्टननं आपल्या खेळाडूला मैदानात केलं KISS; पाहा तो मजेशीर क्षण!

Cricbuzzच्या बातमीनुसार, आयपीएल २०२२चा हंगाम २ एप्रिलपासून सुरू होऊ शकते. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या वेळी सामने वाढल्यामुळे ही लीग ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे १४-१४सामने खेळावे लागणार आहेत. ७ सामने घरच्या मैदानावर तर ७ सामने घराबाहेर खेळवले जातील.

आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mega auction will be held on february 12th and 13th adn
First published on: 23-12-2021 at 13:14 IST