आयपीएल २०२२च्या सध्याच्या आठ फ्रेंचायझींसाठी खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची मुदत मंगळवार आहे. फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे दुपारी १२ वाजेपर्यंत बीसीसीआयकडे पाठवावी लागणार होती. फ्रेंचायझी जास्तीत जास्त ४ खेळाडू संघात ठेवू शकतात. ज्यामध्ये ३ पेक्षा जास्त भारतीय आणि २ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. खेळाडूंना कायम ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनचे वेळापत्रक ठरवले जाईल. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी देखील आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करतील आणि रिलिज केलेल्या खेळाडूंना पूलमध्ये ठेवल्यानंतर, दोन्ही नवीन फ्रेंचायझींना लिलावापूर्वी ३ खेळाडू निवडण्याची संधी दिली जाईल.

आयपीएल २०२२ पूर्वीचा लिलाव हा शेवटचा मेगा लिलाव असू शकतो, अशीही बातमी आहे. या वर्षानंतर, सर्व आयपीएल फ्रेंचायझींनी स्वतःची इकोसिस्टम तयार करावी. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह, कोलकाता नाइट रायडर्स सुनील नरिन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर, सनरायझर्स हैदराबाद केन विल्यमसन, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नॉर्किया आणि राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहेत.

आयपीएल २०२२ रिटेंशन कधी सुरू होईल?

आयपीएल २०२२ रिटेंशन भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता सुरू होईल.

आयपीएल २०२२ रिटेंशनचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

आयपीएल २०२२ रिटेंशनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

आयपीएल २०२२ रिटेंशनचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

तुम्ही हॉटस्टारवर आयपीएल २०२२चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.