scorecardresearch

IPL 2023-Rishabh Pant: ऋषभ पंत IPL मध्ये दिसणार? प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी जखमी खेळाडूसाठी आखली खास योजना, जाणून घ्या

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला होता. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

IPL 2023: Ricky Ponting wants to do this special work for injured Rishabh Pant read what he said in praise
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

Ricky Ponting On Rishabh Pant: भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या १६व्या हंगामात खेळू शकणार नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता. यामुळे तो बराच काळ व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी शुक्रवारी (२४ मार्च) सांगितले की, पंत हा संघाच्या हृदयाचा ठोका आहे आणि फ्रेंचायझीने त्याच्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत, त्यामुळे तो खेळणार नसला तरी देखील सामन्यावेळी उपस्थित असणार आहे.

यावेळी रिकी पाँटिंग म्हणाला की, “पंत हा फ्रेंचायझीचा हृदय आणि आत्मा आहे.” तो पुढे म्हणाला, “माझ्या आदर्श जगात पंत प्रत्येक सामन्यात माझ्यासोबत डगआउटमध्ये बसत असे. जर हे शक्य नसेल, तर आम्ही त्याला सर्व प्रकारे संघाचा भाग बनवू. आम्ही आमच्या टोप्या आणि टी-शर्टवर त्याचा नंबर लावू शकतो. आम्हाला एवढेच स्पष्ट करायचे आहे की पंत आमच्यासोबत नसला तरी तो आमच्यासोबत असून त्याच्याच नेतृत्वाखाली आम्ही खेळत आहोत असे सर्वांना वाटेल. ऋषभ संघाचा प्रमुख असून तो कायमस्वरूपी कर्णधार असणार.” हे सर्व बोलताना पाँटिंग खूप भावूक झाला.

हेही वाचा: WPL 2023, MI-W vs UPW-W: आली रे! मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एंट्री, यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय

दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक कोण असेल?

पंतच्या अनुपस्थितीत संघाचा यष्टिरक्षक कोण असेल? या प्रश्नावर रिकी पाँटिंग म्हणाला की, “याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरफराज खान आमच्या टीममध्ये सामील झाला आहे. सराव सामन्यांनंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पंतांची जागा भरणे सोपे नाही. इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, आम्ही प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकतो. आम्हालाही याचा लाभ घ्यायचा आहे.”

वॉर्नर गेल्या वर्षी दिल्लीशी जोडला गेला होता

डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटींना विकत घेतले. २०२१ च्या हंगामानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला त्यांच्या संघातून वगळले होते. दुखापतग्रस्त पंतच्या जागी वॉर्नर संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी गेल्या मोसमात वॉर्नरने ४८ च्या सरासरीने ४३२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके झळकावली. दिल्लीचा संघ १ एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

हेही वाचा: WPL 2023, MI-W vs UPW-W Highlights: इस्सी वोंगची हॅटट्रिक! मुंबईने यूपी वॉरियर्सची ७२ धावांनी उडवली दाणादाण

पाँटिंगने वॉर्नरचे कौतुक केले

पाँटिंगने दिल्लीत दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लाँच केली.यादरम्यान पॉन्टिंगने डेव्हिड वॉर्नरचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “वॉर्नरमध्ये संघाला चॅम्पियन बनवण्याचे गुण आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ नक्कीच यश मिळवेल.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 14:19 IST

संबंधित बातम्या