आयपीएल २०२४ साठी सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधारपदाचा तगडा अनुभव असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे संघाचे नेतृत्त्व सोपवले आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी कर्णधार आहे, ज्याच्या नावे आयसीसीची दोन मोठी जेतेपद आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने लिलावात तब्बल २०.५ कोटी रुपये खर्चून कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतलं. पॅट कमिन्स हा एक वेगवान गोलंदाज आहे, कमिन्सचा रेकॉर्ड पाहता त्याला कर्णधार करणार असे संकेत मिळत होते आणि हैदराबाद संघाने त्याप्रमाणेच एका वेगवान गोलंदाजाला संघाचा कर्णधार नेमले. तसे पाहता, आयपीएलच्या इतिहासात फारच कमी गोलंदाजांना कर्णधाराची जबाबदारी मिळाली आहे.

आयपीएलमध्ये कर्णधारपदावर फलंदाजांचं वर्चस्व

Ravindra jadeja Lifts Rahul Dravid After Wins Best Fielder Medal
IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
France is worried about captain Kylian Mbappe injury
फ्रान्सला एम्बापेच्या दुखापतीची चिंता; सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावरील विजयात नाकाला दुखापत
No concern at all over Virat Kohlis form Team India batting coach Vikram Rathour reaction in T20 WC 2024 Performance
T20 WC 2024 : विराट कोहलीच्या फॉर्ममुळे टीम इंडिया चिंतेत? फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “दोन-तीन वेळा अशा प्रकारे आऊट…”
Divya Deshmukh wins World Junior Girls chess title
भारताची दिव्या देशमुख विजेती;अंतिम फेरीत बल्गेरियाच्या बेलोस्लाव क्रास्तेवावर मात
Spain Carlos Alcaraz wins French Open sport news
अल्कराझ फ्रेंच स्पर्धेचा नवविजेता; संघर्षपूर्ण अंतिम लढतीत झ्वेरेववर पाच सेटमध्ये मात
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Gautam Gambhir reaction to KKR title
“…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल
Brett Lee on Jasprit Bumrah
T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २००८ मध्ये सुरू झाली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं यंदा १७वे वर्ष आहे. देश-विदेशातील खेळाडू मिळून तयार झालेल्या या संघांचे अनेक दिग्गज खेळाडूंनी नेतृत्त्व केले आहे. शेन वॉर्न, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर असे काही निवडक कर्णधार आहेत, ज्यांच्या नेतृत्त्वाखाली संघाने आयपीएलची जेतेपद पटकावली. पण पाहायला गेलं तर आयपीएलमध्ये कर्णधारपदावर फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गोलंदाजांनी आयपीएल संघांचे कर्णधारपद भूषवले आहे.

१७ वर्षांच्या आयपीएलच्या इतिहासात फारच कमी गोलंदाजांनी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. शेन वॉर्न, अनिल कुंबळे, रवीचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, जहीर खान, डॅनियल व्हेटोरी, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, रशीद खान, सॅम करन अशा दिग्गजांसहित नव्या दमाच्या गोलंदाजांचाही या यादीत समावेश आहे.

शेन वॉर्न – आयपीएलचा पहिला विजेता गोलंदाज कर्णधार

शेन वॉर्न हे नाव जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे पण आयपीएलमध्येही वॉर्नच्या नावे ऐतिहासिक कामगिरी आहे.२००८ च्या आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने पटकावले होते. ऑस्ट्रेलियाचा सर्वात्कृष्ट कर्णधार असलेला शेन वॉर्न हा जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू होता. वॉर्नने २००८ मध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत हे जेतेपद जिंकले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन यांच्यासमवेत एक उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण तयार केले, ज्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. राजस्थानने वॉर्नच्या नेतृत्वाखाली पुढील १३ पैकी ११ सामने जिंकले होते.

हेही वाचा: Ranji Trophy 2024: ‘धवल’ कारकीर्दीची तळपती अखेर

अनिल कुंबळे

शेन वॉर्ननंतर भारताचा कमाल फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी २००९ मध्ये काही काळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्त्व केले होते. २००८ मध्ये आरसीबीने राहुल द्रविडच्या जागी कुंबळेंना कर्णधारपद दिले. त्या हंगामात कुंबळेंच्या नेतृत्त्वाखाली आरसीबीचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला जिथे डेक्कन चार्जर्सने त्यांचा पराभव केला. २००९ मध्ये कुंबळे हे आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट घेणारे आणि टुर्नामेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील यशस्वी गोलंदाज होते. ५ धावांवर ५ विकेट हा त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा होता.

कुंबळेंनंतर २०१६ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खानला संघाचे कर्णधारपद दिले होते. भारतीय संघ किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कधीच संघाचा कर्णधार नसलेल्या जहीरने आयपीएलमध्ये मात्र संघाचे नेृत्त्व केले होते. आयपीएल २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज असलेला रवीचंद्रन अश्विन याला कर्णधारपद दिले होते, पण तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.

हेही वाचा: IPL 2024 सुरू होण्याआधीच ‘या’ खेळाडूंनी घेतली माघार, काहींच्या दुखापती ठरल्या डोकेदुखी

आयपीएलच्या इतिहासातील गोलंदाज कर्णधार

आयपीएल २०११ मध्ये आरसीबी संघाने न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल वेटोरी याला कर्णधारपद दिले होते. २०१२ मध्ये हरभजन सिंगने मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते. सचिन तेंडुलकर संघाचा नियमित कर्णधार होता पण त्याच्या दुखापतीमुळे हरभजनने सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले होते. सनरायझर्स हैदराबाद संघाने नियमित कर्णधार एडन मार्करम राष्ट्रीय संघासाठी सामने खेळत असल्याने २०२३ मध्ये सुरूवातीचे काही सामने भुवनेश्वर कुमार संघाचा कर्णधार होता,त्याचसोबत २०१९ मध्येही त्याने काही सामने संघाचे नेतृत्त्व केले होते.

रवींद्र जडेजा २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार होता. २०२२चा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीच्या जागी चेन्नई संघाचा कर्णधार म्हणून जडेजाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याने सीझनच्या मध्यातच धोनीकडे कर्णधारपद पुन्हा सोपवले. २०२३ च्या आयपीएलमध्ये शिखर धवनला दुखापत झाली होती, त्यामुळे पंजाब किंग्ज संघाच्या सहा सामन्यांमध्ये सॅम करनने संघाचे नेतृत्त्व केले होते. त्याचसोबत हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान संघाचा कर्णधार होता.

पॅट कमिन्सच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. एसए-ट्वेन्टी लीगमध्ये सलग दोन वर्षे सनरायझर्स इस्टर्न केप संघाला जेतेपद मिळवून देणारा एडन मारक्रम आयपीएलमध्येही हैदराबाद संघाचा कर्णधार होता. पण कमिन्सला संघात सहभागी करताच त्यांनी मार्करमऐवजी कमिन्सवर विश्वास दाखवला. कमिन्सने टी-२० फॉरमॅटमध्ये यापूर्वी कधी कर्णधारपद भूषवलेले नाही. कमिन्स फारच कमी टी-२० लीग खेळतो. कमिन्स हा एक वेगवान गोलंदाज असून त्याला दुखापतींची शक्यताही आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा कमिन्स भाग होता पण त्याच्याकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवली नव्हती. त्यामुळे सनरायझर्स संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास खरा करून दाखवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे.