इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १७ व्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल संघांमध्ये अनेक नवनवीन बदल झाले आहेत. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या टी-२० क्रिकेटच्या महासंग्रामापूर्वीच काही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत तर काहींनी आपली नावे मागे घेतली आहेत. यामध्ये आता भारतीय क्रिकेट संघाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरसुध्दा सामील होणार की काय अशी भिती चाहत्यांच्या मनात आहे. पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे अय्यर काही आयपीएल सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आहेत. श्रेयस अय्यरपूर्वी मार्क वूड, जेसन रॉय, प्रसिध कृष्णा आणि असे काही खेळाडू आयपीएल २०२४ सुरू होण्याआधीच बाहेर पडले आहेत.

मार्क वूड
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आगामी आयपीएल हंगामात सहभागी होणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक आणि कसोटी मालिका असल्याने ‘वर्कलोड मॅनेजमेंट’मुळे ईसीबीने नकार दिला आहे आणि यामुळेच तो हा हंगाम खेळताना दिसणार नाही. २०२२ च्या लिलावात त्याला लखनौने ७.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. २०२३च्या आयपीएल हंगामात खेळताना त्याने एलएसजीसाठी चार सामन्यांमध्ये ११ विकेट घेतल्या. मार्क वुडच्या जागी लखनऊ संघाने गाबाच्या मैदानावर तुफान कामगिरी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून देणारा गोलंदाज शमार जोसेफ याला संघात घेतले आहे.

ipl 2024 ms dhoni madness was seen in narendra modi stadium fan breaches security and bows down in front of him during gt vs csk match
धोनीची हवा, हा तर जबरा फॅन भावा! हेलिकॉप्टर शॉट मारताच चाहत्याची मैदानात धाव अन्…; VIDEO व्हायरल
Rohit Sharma Wont be at Mumbai Indians next year says Wasim Akram
“रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य
MSK Prasad Statement on Hardik Pandya
सध्या देशात हार्दिकपेक्षा चांगला वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू कोणी आहे? – BCCI चे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद
Madan Lal's reaction to Indian fast bowlers
T20 World Cup 2024 : “भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण कमकुवत…”, माजी विश्वविजेत्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
No captain or selector can ignore him Support grows for Shivam Dube's
T20 WC 2024 : ‘कोणताही कर्णधार किंवा निवडकर्ता ‘या’ खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही’: आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य
Mutafizur Rehman To Miss Chennai Super Kings Matches as going back to bangladesh for BAN vs ZIM T20 Series
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, प्लेऑफसाठी महत्त्वाच्या सामन्यांमधून हा गोलंदाज होणार बाहेर
Hardik Pandya Mental Health Going Bad Due to IPL 2024 Booing Abuses In Stadium
“हार्दिक पंड्याचं मानसिक आरोग्य बिघडतंय, तो तणावाचा..”, IPL मधील शिवीगाळ, ट्रोलिंग पाहून माजी सलामीवीराची माहिती
Suresh Raina interview on lantop,
IPL 2024 : ‘ज्या संघांनी पार्ट्या केल्या त्यांनी अजून आयपीएल जिंकली नाही’, सुरेश रैनाने नाव घेता ‘या’ संघांना डिवचले

डेव्हॉन कॉन्वे
न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे अंगठ्याच्या दुखापतीमुळे IPL 2024च्या पहिल्या टप्प्यातील सामने खेळताना दिसणार नाही. कॉन्वे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गेल्या मोसमात त्याने संघासाठी सर्वाधिक ६७२ धावा केल्या होत्या. कॉन्वेला २०२३ च्या फायनलमध्ये सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले होते. ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे यांची सलामीची जोडी चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावते. चेन्नईच्या संघाने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

प्रसिध कृष्णा
भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या पोटरी आणि गुडघ्याची वाटी यांना सांधणाऱ्या स्नायूला दुखापत झाली आहे.गेल्या महिन्यात २३ फेब्रुवारीला यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राजस्थान रॉयल्ससाठी सलग दुसऱ्यांदा आयपीएल खेळण्यासाठी तो मुकणार आहे. गेल्या वर्षीही तो दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. कृष्णाने पदार्पणाच्या हंगामात (२०२२) राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या १७ सामन्यांत १९ विकेट्स घेतले होते.

जेसन रॉय
इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर जेसन रॉयनेही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेतले आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. गेल्या मोसमात त्याने केकेआरसाठी ८ सामने खेळत आपल्या शानदार फलंदाजीने छाप सोडली. जेसन रॉयच्या जागी बदली खेळाडू म्हणून संघाने इंग्लंडच्या फिल सॉल्टची वर्णी केली आहे.

हॅरी ब्रुक
आयपीएल २०२४च्या मिनी लिलावात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांना विकत घेतले. सनराझर्स हैदराबाद संघाने रिलीज केल्यानंतर दिल्लीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले पण यंदाचा सीझन मात्र तो खेळताना दिसणार नाही.त्याच्या आजीच्या निधनानंतर या खेळाडूने आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही त्याने देत माघार घेतली होती.

मोहम्मद शमी
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया झाल्याने तो यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी टाचेच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेला होता. शमी आयपीएलसह आगामी टी-२० विश्वचषकातही खेळताना दिसणार नाही. गुजरात जायंट्स संघाचा तो भाग असून गुजरातने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

गस अ‍ॅटकिन्सन
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सननेदेखील वर्कलोड मॅनेजमुळे आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला १ कोटी रूपयांना संघात सामील केले होते. अ‍ॅटकिन्सनने नाव मागे घेतल्यानंतर त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या दुशमंथ चमीरा याला संघात सामील केले.