ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज रिकी पॉन्टिंगला मुंबई इंडियन्सच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सकडून अखेरचा मोसम खेळला होता. यंदाच्या मोसमासाठी त्याची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन सामन्यांपासून पॉन्टिंग मुंबई इंडियन्सबरोबर असल्याचे सांगितले जात आहे. ‘‘पुन्हा एकदा मी मुंबई इंडियन्सच्या सेवेसाठी रुजू झालो आहे. गेला मोसम संघासाठी फार चांगला होता. तेव्हा खेळाडूंची संघाबद्दलची भावना समजली होती. सध्या संघाची कामगिरी चांगली होत नसली तरी कामगिरी सुधारण्यासाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू,’’ असे पॉन्टिंगने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2014 रोजी प्रकाशित
रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा सल्लागार
ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज रिकी पॉन्टिंगला मुंबई इंडियन्सच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सकडून अखेरचा मोसम खेळला होता. यंदाच्या मोसमासाठी त्याची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन सामन्यांपासून पॉन्टिंग मुंबई इंडियन्सबरोबर असल्याचे सांगितले जात …
First published on: 28-04-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 ricky ponting joins mumbai indians as advisor