IPL First Auction Dhoni Price: भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च २०२४ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी १९ डिसेंबर २०२३ रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे. आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होत असून, यावेळी तो दुबईत होणार आहे. तत्पूर्वी २००८ मधील लिलावातील एक पत्रक व्हायरल होत आहे. यामध्ये २००८ मध्ये म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी लिलावात सर्वात महाग कोणते खेळाडू कोणत्या संघांनी आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतले होते हे यातून दिसून येत आहे. या पत्रकामध्ये शेन वॉर्नपासून ते शोएब अख्तरपर्यंत अनेकांसाठी संघांनी लावलेली बोली व अंतिम रक्कम दिसून येत आहे.

आपण बघू शकता की, धोनीला २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने १.५ दशलक्ष रुपयांमध्ये मध्ये निवडले होते, ज्यामुळे तो उद्घाटनाच्या IPL लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. धोनीसाठी ऑल आऊट होण्याचा चेन्नईचा निर्णय हा १५ वर्षातील त्यांचा सर्वोत्तम निर्णय आहे असे म्हणता येईल कारण अद्यापही धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सला अल्पावधीत अभूतपूर्व उंचीवर नेणाऱ्या कॅप्टन कूल एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.

आज रिचर्ड मॅडले, यांनी २००८ मधील पहिल्या लिलावपत्रकाचा फोटो शेअर केला आहे. त्या शीटवर शेन वॉर्न, शोएब अख्तर, अॅडम गिलख्रिस्ट, मुथय्या मुरलीधरन आणि महेला जयवर्धने यांसारख्या स्टार खेळाडूंसोबत धोनीच्या खरेदीचे तपशील लिहिले आहेत.

हे ही वाचा<< मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार बदलणार असल्याचं कधी कळवलं? हिटमॅनला खरंच कल्पना नव्हती का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०२३ मध्ये, धोनी दुखापत झालेल्या गुडघ्याने खेळला परंतु अहमदाबादमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला हरवून जेतेपद जिंकण्यासाठी आपल्या संघाला प्रेरणा देण्यात यशस्वी झाला. रांचीत जन्मलेल्या या खेळाडूने सर्व १६ सामने खेळले. त्याने १२ डावात १८२.४६ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या. अलीकडेच धोनीची जगप्रसिद्ध नंबर 7 जर्सीबाबत बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर #ThalaforaReason हे हॅशटॅग ७ नंबरसह ट्रेंड होत होते, यानंतर आता धोनीची जर्सी बीसीसीआयने निवृत्त करण्याची घोषणा केली आहे.