आयपीएलच्या बाराव्या पर्वासाठी आज लिलाव झाला. या लिलावामध्ये अनेक नवीन खेळाडूंनी कोटी कोटीची उड्डाणे घेतली आहेत. तर काही बड्या खेळाडूंना चांगलाच आर्थिक फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. रणजी, तामिळनाडू लीग, भारताचा १७ आणि १९ वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी करणाऱ्यांसाठी संघमालकांनी चांगली किंमत मोजल्याचे दिसत आहे. जाणून घेऊयात कोण आहेत या लिलावामधील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू…

वरुण चक्रवर्ती
तामिळनाडूचा मिस्ट्री बॉय वरुण चक्रवर्ती ठरला ८ कोटींचा मानकरी ठरला आहे. ८ कोटी ४० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याला आपल्या संघात घेतलं आहे.

जयदेव उनाडकट
गतवर्षीचा महागडा भारतीय खेळाडू जयदेव उनाडकट राजस्थान रॉयल्समधून खेळणार आहे. उनाडकटवर ८ कोटी ४० लाखांची बोली लावण्यात आली.

सॅम करन
इंग्लंडच्या सॅम करनसाठी ७ कोटी २० लाखांची बोली पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने लावली.

कॉलिन इन्राग
कॉलिन इन्रागला दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले. कॉलिनसाठी दिल्लीने ६ कोटी ४० लाखांची बोली लावली.

शिवम दुबे
मुंबईकर असणाऱ्या शिवम दुबेला रणजीमधील कामगिरीमुळे चांगली किंमत मिळाली. शिवमला ५ कोटींची बोली मिळाली. विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ५ कोटींची बोली लावत शिवम दुबेला आपल्या संघात घेतलं आहे

मोहीत शर्मा
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने मोहीत शर्मावर ५ कोटींची बोली आपल्या संघात घेतलं आहे.

अक्षर पटेल
अक्षर पटेलवर ५ कोटींची बोली लावत दिल्ली कॅपिटल्स संघाकडे त्याला विकत घेतले.

कार्लोस ब्रेथवेट
विंडीजच्या टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट कोलकाता नाईट रायडर्स आपल्या संघात घेतले. ब्रेथवेटला संघात घेण्यासाठी त्यांनी ५ कोटी रुपयांची बोली लावली.

प्रभसिमरन सिंह
प्रभसिमरन सिंहवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अनपेक्षित बोली लावली. पंजाब संघाकडून खेळण्यासाठी प्रभसिमरनला ४ कोटी ८० लाख इतकी रक्कम मिळणार आहे.

मोहम्मद शमी

बाराव्या हंगामात मोहम्मद शमी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. मोहम्मद शमीसाठी चेन्नई, पंजाब आणि राजस्थान संघामध्ये चढाओढ पहायला मिळाली. शमीसाठी पंजाबने ४ कोटी ८० लाखांची बोली लावली.

निकोलस पुरन
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने निकोलस पुरनवर ४ कोटी २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.

शिमरॉन हेटमायर
विंडीजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विकत घेतले आहे. हेटमायरवर ४ कोटी २० लाखांची बोली लावण्यात आली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर अखेरच्या क्षणात मात करुन बंगळुरुने हेटमायरला आपल्या संघात घेतलंय.

अक्षदीप नाथ
अक्षदीप नाथवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चक्क ३ कोटी ६० लाखांची बोली लावून त्याला संघात घेतले.

बरिंदर सरन
मुंबई इंडियन्स संघाने बरिंदर सरनला आपल्या संघात घेण्यासाठी ३ कोटी ४० लाख रुपये मोजले.

वरुण अॅरोन
यंदा वरुण अॅरोन राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. संघाने अॅरोनवर २ कोटी ४० लाखांची बोली लावली.

शेर्फेन रुदफोर्ड
विंडीजच्या शेर्फेन रुदफोर्डवर दिल्ली कॅपिटल्स संघाने २ कोटींची बोली लावली.

लसिथ मलिंगा
लसिथ मलिंगाचं मुंबईच्या संघात पुनरागमन झालं आहे. २ कोटींची बोली लावत मलिंगा मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले.

हनुमा विहारी
आयपीएलच्या बाराव्या हंगामात लिलाव लागलेला हनुमा विहारी हा पहिला खेळाडू ठरला. हनुमा विहारीवर दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांची बोली लावली. विहारीला संघात घेण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि राजस्थान या ३ संघाच्या चढाओढ दिसून आली.

लॉकी फर्ग्युसन
लॉकी फर्ग्युसनवर कोलकात्याच्या संघाने १ कोटी ६० लाखांची बोली लावली.

प्रयास रॉय बर्मन
प्रयास रॉय बर्मन या १६ वर्षीय खेळाडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १ कोटी ५० लाखांची बोली लावली.

वृद्धीमान साहा
या आयपीएलमध्ये वृद्धीमान साहा पुन्हा सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. १ कोटी २० लाखांच्या बोलीवर साहाला संघात घेण्यात आले आहे.

ऑश्ने थॉमस
ऑश्ने थॉमसवर राजस्थान रॉयल्स संघाने १ कोटी १० लाखांची बोली लावली.

इशांत शर्मा
इशांत शर्माचं आयपीएलमध्ये दणक्यात पुनरागमन झाले आहे. १ कोटी १० लाखांच्या बोलीवर इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्स संघाने विकत घेतले आहे.

मॉईजेस हेन्रिकेस
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॉईजेस हेन्रिकेसला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १ कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतले आहे.

युवराज सिंह
युवराज सिंहवर दुसऱ्या फेरीत बोली लावण्यात आली. १ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून यंदा युवराज खेळणार आहे.

मार्टीन गप्टील
मार्टीन गप्टीलवरही दुसऱ्या फेरीत १ कोटींची बोली लागली. सनराईजर्स हैदराबाद संघाकडून गप्टील खेळणार आहे.