IPL Mini Auction 2023 Players List: आयपीएल २०२३ साठी लिलाव प्रक्रिया कोची येथे सुरू झाली आहे. आगामी हंगामासाठी पहिली बोली न्यूझीलंडचा विद्यमान कर्णधार केन विल्यमसनवर लागली. त्याला फक्त दोन कोटींची बोली लागली आहे. त्याला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने आपल्या ताफ्यायत सामील केले आहे.
केन विल्यमसन गुजरात संघात येण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद कॅम्पमध्ये बराच काळ राहिला आहे. इतकेच नाही तर त्याने अनेक सामन्यांमध्ये एसआरएचचे नेतृत्व देखील केले. पण त्याच्या प्रतिनिधित्वात संघाची कामगिरी काही विशेष राहिली नव्हती. त्यामुळे आयपीएल २०२३ च्या लिलापूर्वी हैदराबाद संघाने, त्याला आपल्या करारातून मुक्त केले होते.
आयपीएल २०२३ च्या लिलावात विल्यमसनला मोठा फटका बसला आहे. याआधी हैदराबाद संघाने त्याला गेल्या मोसमात १४ कोटी रुपयांच्या मोबदल्यात कायम ठेवले होते. यावेळी तो केवळ दोन कोटी रुपयांना विकला गेला. अशाप्रकारे त्यांचे १२ कोटींचे नुकसान झाले आहे.
केन विल्यमसनची आयपीएल कारकीर्द –
हेही वाचा – IPL 2023 Auction: पहिल्या टप्प्यात ‘हे’ पाच खेळाडू ठरले सर्वात महागडे, पाहा कोण आहेत
विल्यमसनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने देशातील या प्रतिष्ठित लीगमध्ये ७६ सामने खेळले असून ७५ डावांमध्ये ३६.२२ च्या सरासरीने २१० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याची १८ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये विल्यमसनचा स्ट्राइक रेट १२६.०३ आहे.