: ‘आयपीएल’ क्रि के टमधील कोलकाता नाइट रायडर्सच्या बाद फेरीच्या वाटचालीपुढे रविवारी तळाच्या स्थानावरील सनरायजर्स हैदराबादचा अडथळा असणार आहे.
११ सामन्यांपैकी नऊ पराभव पत्करणाऱ्या हैदराबादचे बाद फेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु १२ सामन्यांद्वारे १० गुण मिळवणाऱ्या कोलकाताच्या आशा अद्याप टिकून आहेत. २०१६मधील ‘आयपीएल’ विजेता कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पदावरून दूर केल्यानंतर त्याला हैदराबादने संघातूनही वगळले आहे. परंतु त्यानंतर केन विल्यम्सनलाही संघाला विजयपथावर आणता आलेले नाही.
अमिरातीमध्ये कोलकाताने तीन विजय मिळवले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी सातत्याने धावा करीत आहेत. नितीश राणाला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णयही फलदायी ठरत आहे. परंतु शुभमन गिल चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरत आहे.
’ वेळ : दुपारी ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १