लाचलुचपत प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाचा संशय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई : लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब किंग्ज संघाचा अष्टपैलू दीपक हुडाची चौकशी होणार आहे. मंगळवारी पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापूर्वी काही तास हुडाने पंजाब संघाचा लोगो असलेले हेल्मेट घालतानाचे छायाचित्र ‘ट्वीट’ केले.

‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीयू) हुडाच्या या छायाचित्राची चौकशी करणार आहे. कोणत्याही सामन्यापूर्वी संघाच्या रचनेबद्दल माहिती देण्यावर बंदी आहे,’’ असे ‘एसीयू’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हुडाने ‘ट्वीट’मध्ये पुन्हा स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे म्हटले. त्यामुळे तो राजस्थानविरुद्ध खेळणार असल्याचे सामन्यापूर्वीच समजले. ‘आयपीएल’ खेळाडूंच्या हालचाली आणि त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्टवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl deepak hooda inquiry suspicion of violation of anti bribery rules akp
First published on: 23-09-2021 at 02:04 IST