आयपीएलचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवण्यात आल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) दिलेल्या निषेध पत्राबाबत मंगळवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. आयपीएल प्रशासकीय समितीने आपला निर्णय लांबणीवर टाकला आहे.
‘‘मंगळवारी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही,’’ अशी माहिती बीसीसीआयचे आयपीएलसंदर्भातील प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी सांगितले. तथापि, हा निर्णय केव्हा होईल, हे मात्र त्यांना सांगता आले नाही.
कोणतेही कारण न देता आयपीएलचा अंतिम सामना मुंबईहून बंगळुरूला हलवण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आल्यानंतर एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीसीसीआयचा निषेध करणारे पत्र पाठवले होते. पवार यांनी हे पत्र आयपीएल प्रशासकीय समिती तसेच बीसीसीआयच्या सर्व सदस्यांनाही पाठवून अंतिम सामना स्थलांतरित करण्यामागचे कारण स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते.
शनिवारी आयपीएल प्रशासकीय समितीने आयपीएलचा १ जूनला होणारा अंतिम सामना मुंबईहून बंगळुरूला हलवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. याबाबत स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने म्हटले होते की, ‘‘आयपीएलच्या यंदाच्या हंगामतील २० सामने परदेशात खेळवण्यात आले. या पाश्र्वभूमीवर प्ले-ऑफचे सामने आणखी काही वेगळ्या स्टेडियमवर व्हावे, या उद्देशाने प्रशासकीय समितीच्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्ले-ऑफचे सामने आयोजित करण्यासाठी अनेक असोसिएशन्सनी आपली उत्सुकता प्रकट
केली.’’
यानिमित्ताने एमसीएने सोमवारी तातडीची कार्यकारी समितीची बैठक घेतली होती. त्यावेळी आयपीएल प्रशासकीय समिती मंगळवारी आपला निर्णय देणार आहे, असे सांगण्यात आले होते. एमसीएचे अध्यक्ष पवार आणि उपाध्यक्ष रवी सावंत यांनी गावस्कर यांच्याशी चर्चा करून आपली बाजू मांडली होती. गावस्कर या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणार होते.

Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष
IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्सचा तळपता विजय; चेन्नईला केलं चीतपट