आयपीएल २०२२ मेगा लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे, यावेळी एकूण १२१४ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये भारताचे ८९६ आणि ३१८ विदेशी खेळाडू असतील. ३१८ परदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू भूतानचाही आहे. मिक्यो दोरजी असे या खेळाडूचे नाव आहे. गेल्या वर्षी दोरजी भूतानचा असा पहिला क्रिकेटपटू बनला होता, ज्याने देशाबाहेर फ्रेंचाइजी क्रिकेट लीग खेळण्याचा मान मिळाला होता. दोरजी नेपाळला जाऊन एव्हरेस्ट प्रीमियर लीग खेळला. या लीगमध्ये दोरजी ललितपूर देशभक्त संघाकडून खेळताना दिसला. आता दोरजीने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली.

२२ वर्षीय मिक्यो दोरजीने त्याच्या इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. भूतानच्या या खेळाडूने धोनीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ”माहीने दिलेला सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझ्या कारकिर्दीत मी या सल्ल्याचे पालन करेल.”

हेही वाचा – IPL 2022 : ‘बेबी एबी डिव्हिलियर्स’ची मेगा ऑक्शनमध्ये एन्ट्री..! ‘या’ संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक

नोंदणी करून दोरजीने आयपीएलच्या इतिहासात आपल्या देशाचे नाव नोंदवले आहे. ”नोंदणीनंतर दुसरी पायरी म्हणजे खेळाडूंना शॉर्टलिस्ट करणे. माझे नाव अंतिम यादीत येईल अशी मला फारशी आशा नाही. पण नोंदणीमध्ये माझे नाव येणे ही माझ्या देशासाठी मोठी गोष्ट आहे”, असे दोरजीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोरजी एक वेगवान गोलंदाज आहे. तो फलंदाजीही करतो. त्याने २०१८ मध्ये मलेशियाविरुद्ध पदार्पण केले होते. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, दोरजीने एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २७ धावा केल्या.