चेन्नईच्या संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर एकतर्फी मात करत गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मानहाणीकारक पराभवानंतर दिल्लीची दुसऱ्या स्थानी घसर झाली आहे. चेन्नई १८ गुणांसह अव्वल स्थानावर तर दिल्ली १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. ‘आयपीएल’ गुणतालिकेत सध्या मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर असून, त्यांनी १२ सामन्यांतून १४ गुण मिळवले आहेत, तर हैदराबादने १२ सामन्यांमध्ये १२ गुण कमावले आहेत. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला एक, तर हैदराबादला दोन विजयांची आवश्यकता आहे. गुरुवारी मुंबईचा संघ जिंकल्यास ते बाद फेरीसाठी थेट पात्र होतील, परंतु हैदराबादचा संघ जिंकल्यास दोन्ही संघांनी अखेरच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर प्लेऑफच्या शेवटच्या दोन स्थानांसाठी पाच संघात चुरस असल्याचे दिसते. यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या संघाचा समावेश आहे. मुंबई संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. एक सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने मुंबईचा संघ प्रयत्न करेल. पण दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असेल. जाणून घेऊयात गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी आहे.

संघसामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
चेन्नई सुपरकिंग्ज१३+०.२०९१८
दिल्ली कॅपिटल्स१३-०.०९६१६
मुंबई इंडियन्स१२+०.३४७१४
सनराईजर्स हैदराबाद१२+०.७०९१२
राजस्थान रॉयल्स१३-०.३२१११
कोलकाता नाईट रायडर्स१२+०.१००१०
किंग्ज इलेव्हन पंजाब१२-०.२९६१०
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१३-०.६९४

आयपीएलच्या या सत्रात सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. ६९२ धावांसह ऑरेंज कॅप सध्या डेव्हिड वॉर्नरकडे आहे. ५२० धावांसह लोकेश राहुल दुसऱ्या स्थानवर आहे. तर पर्पल कॅपवर दिल्लीच्या रबाडाचे वर्चस्व आहे. २५ विकेटसह रबाडाकडे पर्पल कॅप आहे. दुसऱ्या स्थानावर इम्रान ताहिर असून त्याच्या नावावर २१ विकेट आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl points table and updated orange cap %e2%80%89purple cap list
First published on: 02-05-2019 at 10:44 IST