Contact Siraj for information on RCB team: आयपीएल २०२३ मध्ये फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी हे प्रकरण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी संबंधित आहे. रिपोर्टनुसार, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितले.’ सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली आहे. बीसीसीआयने भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली आहे. कोणत्याही खेळाडूने किंवा अधिकाऱ्याने बुकीशी संपर्क साधल्याची माहिती बीसीसीआयला दिली नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकते.

एका ट्रक ड्रायव्हरने सिराजशी संपर्क साधला –

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ‘गेल्या सामन्यात सट्टेबाजीदरम्यान बरेच पैसे गमावल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीला (जो ड्रायव्हर आहे) सिराजकडून संघातील माहिती हवी होती. त्या व्यक्तीने सिराजला फोन केला. मात्र यानंतर सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ही माहिती दिली. मात्र तो बुकी नव्हता. हा हैदराबादचा ड्रायव्हर आहे, ज्याला आयपीएल सामन्यांदरम्यान पैसे खर्च लावण्याची सवय आहे. सट्टेबाजीत त्याने बरेच पैसे गमावले आहेत. त्यामुळेच त्यांनी सिराजशी संपर्क साधून संघाच्या आतील माहिती जाणून घेण्यासाठी कॉल केला होता.

हेही वाचा – IPL 2023: ”… म्हणून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात अश्रू आले”, इयान बिशपचा मोठा खुलासा

सिराजने लगेच बीसीसीआयला कळवले –

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. सिराजने तातडीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या घटनेची माहिती दिली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा – MI vs SRH: अर्जुन तेंडुलकरचे कौतुक करताना रोहित शर्माचे मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आयुष्य एक पूर्ण वर्तुळात…’

फिक्सिंग याआधीही झाले आहे –

आयपीएलमध्ये फिक्सिंगचे सावट पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगची प्रकरणे घडली आहेत. या अगोदर फिक्सिंग झाली होती, तेव्हा एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जच्या गुरनाथ मयप्पनवरही स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अशा गोष्टींना सामोरे जाण्यासाठी कठोर नियम केले तयार केले आहेत.