आज हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्या या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळवला जातोय. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आलेले आहे. तरीदेखील आजचा सामना चांगलाच अटीतटीचा होत आहे. या सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा अभिषेक शर्मा थरारक पद्धतीने झेलबाद झाला आहे. पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोनने थेट सीमारेषेवर त्याचा झेल टिपला आहे.

हेही वाचा >>> आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, उमरान मलिक, दिनेश कार्तिकला संधी; विराटला विश्रांती

नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरला. संघाच्या १४ धावा झालेल्या असताना प्रियाम पराग झेलबाद झाला. तर दुसरीकडे राहुल त्रिपाठीच्या रुपात हैदराबादला दुसरा झटका बसला. त्रिपाठीला २० धावा करता आल्या. त्यानंतर सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> मुंबईचा विजय होताच बंगळुरुकडून जंगी सेलिब्रेशन; कोहली, फॅफ डू प्लेसिसची फूल टू धमाल, पाहा व्हिडीओ

त्रिपाठी बाद झाल्यानंतर संघाच्या ७६ धावा झालेल्या असताना अभिषेक शर्मादेखील बाद झाला. ४३ धावांवर असताना त्याने हरप्रित ब्रारच्या रुपात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने थेट हवेत उंच झेप घेत एका हाताने चेंडूला पकडले. परिणामी अभिषेकला झेलबाद व्हावं लागलं. लियामने उंच उडी घेत एका हाताने झेल टिपल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हेही वाचा >>> DRS का घेतला नाही? खुद्द ऋषभ पंतने सांगितलं कारण; दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, प्रियाम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदिशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), फजलहक फारुकी, उमरान मलिक</p>

हेही वाचा >>> दिल्लीविरोधातील सामन्यात मुंबईचा विजय, फायदा मात्र बंगळुरुला; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पंजाब किंग्ज संघाचे प्लेइंग इलेव्हन

जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), प्रेरक मंकड, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग</p>