David Warner Praises Ishant Sharma: आयपीएल २०२३ च्या २८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४ गडी राखून पराभव केला. संघाने मोसमातील पहिला विजय नोंदवला. याआधी दिल्लीला सलग पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सहाव्या सामन्यात दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकात केवळ १९ धावा देत २ बळी घेतले. इशांतची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. सामन्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने इशांतचे कौतुक केले. त्याने इंस्टाग्रामवर एक मनोरंजक पोस्ट देखील शेअर केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने सर्वबाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.२ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकात्याच्या फलंदाजीदरम्यान इशांतने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याने नितीश राणा आणि सुनील नरेनला बाद केले. सामन्यानंतर वॉर्नरने इशांतचे कौतुक करताना सांगितले की, आजारातून बरे झाल्यानंतर इशांतने शानदार पुनरागमन केले आहे. त्याची कामगिरी अप्रतिम होती.

दिल्लीच्या या मोसमातील पहिल्या विजयानंतर कर्णधार डेव्हिड वार्नर म्हणाला, “आम्हाला गोलंदाजी युनिटचा अभिमान आहे. पॉवर-प्लेमध्ये विकेट्स घेण्यात आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही एकमेकांशी खूप प्रामाणिक आहोत. ज्या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्याबद्दल आम्ही खुलेपणाने बोलतो.”


विशेष म्हणजे दिल्ली गुणतालिकेत तळाशी आहे. पहिल्या सामन्यात लखनौकडून त्याचा ५० धावांनी पराभव झाला होता. यानंतर दिल्लीचा गुजरात टायटन्सने ६ विकेट्सने पराभव केला. राजस्थानेही ५७ धावांनी पराभव केला. मुंबईनेही दिल्लीविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूनेही त्यांचा २३ धावांनी पराभव केला. सलग पाच सामने गमावल्यानंतर दिल्लीने पहिला विजय मिळवला. दिल्लीने कोलकात्याविरुद्ध कठोर परिश्रमानंतर ४ गडी राखून विजय मिळवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली संघाने कोलकाताविरुद्ध विजयाचे खाते उघडले –

दिल्ली कॅपिटल्ससाठी या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही ज्यामध्ये संघाला त्यांच्या सुरुवातीच्या ५ सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्यांच्या ६व्या साखळी सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर या हंगामातील गुणतालिकेत आपले गुणांचे खाते उघडण्यात यश मिळविले.