आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रवास संपला आहे. एलिमिनेटर सामन्यात, राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा चार विकेट्स आणि ६ चेंडू राखून पराभव. आरसीबीचा संघ आतापर्यंत सर्व १७ हंगाम खेळणारा संघ , पण आजपर्यंत कधीही विजेतेपद जिंकू शकलेले नाही. आरसीबीने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करून प्लेऑफचे स्थान पटकावले होते. RCB ने CSK विरुद्धचा विजय मिळवून प्लेऑफ गाठल्यानंतर असं सेलिब्रेशन केलं जणू IPL ट्रॉफी जिंकली. या सामन्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यांना चिडवतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण चाहत्यांशिवाय माजी CSK क्रिकेटर अंबाती रायडूने सीएसकेचा हा पराभव खूपच मनावर घेतला आहे.

सीएसके आणि आरसीबीचे चाहते एकमेकांना चिडवत होते, पराभवानंतर आनंद साजरा करत होते. पण या सगळ्यात अंबाती रायडूही मागे नव्हता. त्याने सामन्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट करत आरसीबीला चिडवले आहे. रायुडूने CSK चा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे दिसत आहेत. हे सर्व खेळाडू CSK बसमध्ये पाच आयपीएल ट्रॉफी मिळाल्याचा विजय साजरे करत आहेत. हा व्हीडिओ शेअर करत त्याने आरसीबीला चेन्नईसारख्या संघाला साधं समजू नये, पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेला हा संघ आहे, असे जणू तो त्यांना सांगत आहे.

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

सीएसके आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघ आहेत. या दोघांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी पाच जेतेपदे पटकावली आहेत. तर आरसीबीच्या खात्यात एकही ट्रॉफी नाही. रायुडूबद्दल बोलायचे झाले तर तो CSK आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही फ्रँचायझी संघांचा भाग आहे.

रायडूने आरसीबीने राजस्थानविरूद्धचा सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या संघावर चांगलाच निशाणा साधला. स्टार स्पोर्ट्सबरोबर चर्चा करताना रायडू म्हणाला, रायडू म्हणाला, “आरसीबीने हे समजून घेतले पाहिजे की, ते आक्रमक सेलिब्रेशन करून आयपीएल ट्रॉफी जिंकू शकत नाहीत. फक्त चेन्नई सुपर किंग्जला हरवलं म्हणजे आयपीएल ट्रॉफी जिंकली असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला एक टीम म्हणून प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.