Andre Russell has become fastest batsman to hit 200 sixes : आयपीएलच्या १७व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून २०८ धावा केल्या. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाजी आंद्रे रसेलसमोर दिसले. त्याने २५ चेंडूत २५६ च्या स्ट्राईक रेटने ६४ धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून ३ चौकारांसह ७ गगनचुंबी षटकार ठोकले. यासोबतच रसेलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यामध्ये सर्वात कमी डावात २०० षटकार पूर्ण करण्याचा समावेश आहे.

सर्वात कमी चेंडूत ठोकले २०० षटकार –

आंद्रे रसेल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत २०० षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १३२२ चेंडूत २०० षटकार ठोकले. याआधी ख्रिस गेलने १८११ चेंडूत, किरॉन पोलार्डने २०५५ चेंडूत , एबी डिव्हिलियर्सने २७९० चेंडूत , महेंद्रसिंग धोनीने ३१२६ चेंडूत आणि रोहित शर्माने ३७९८ चेंडूत २०० षटकार मारले होते. रसेलने आयपीएलमध्ये १९ वेळा ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. या बाबतीत फक्त ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे. गेलने आयपीएलमध्ये २९ वेळा ५ किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत.

सर्वात कमी चेंडूत आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करणारे फलंदाज –

१३२२ चेंडू – आंद्रे रसेल
१८११ चेंडू – ख्रिस गेल
२०५५ चेंडू – किरॉन पोलार्ड
२७९० चेंडू – एबी डिव्हिलियर्स
३१२६ चेंडू – एमएस धोनी
३७९८ चेंडू – रोहित शर्मा</p>

हेही वाचा – IPL 2024 : लिव्हिंगस्टोनचा विजयी षटकार आणि पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय, सॅम करन ठरला विजयाचा शिल्पकार

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर –

आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा रसेल हा नववा फलंदाज ठरला आहे. यासाठी त्याने ९७ डाव घेतले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १४१ डावात ३५७ षटकार मारलेत. त्याच्याशिवाय रोहित शर्माने २५७, एबी डिव्हिलियर्सने २५१, महेंद्रसिंग धोनीने २३९, विराट कोहलीने २३५, डेव्हिड वॉर्नरने २२८, किरॉन पोलार्डने २२३ आणि सुरेश रैनाने आयपीएलमध्ये २०३ षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

३५७ – ख्रिस गेल (१४१ डाव)
२५७ – रोहित शर्मा (२३८ डाव)
२५१ – एबी डिव्हिलियर्स (१७० डाव)
२३९ – एमएस धोनी (२१८ डाव)
२३५ – विराट कोहली (२३० डाव)
२२८ – डेव्हिड वॉर्नर (१७७ डाव)
२२३ – किरॉन पोलार्ड (१७१ डाव)
२०३ – सुरेश रैना (२०० डाव)
२०० – आंद्रे रसेल (९७ डाव)

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून २०८ धावा केल्या. फिलिप सॉल्ट (५४), रमणदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेल (६४) यांनी संघाला हे लक्ष्य गाठण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या चार फलंदाजांशिवाय केकेआरचा कोणताही खेळाडू जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.

हेही वाचा – IPL 2024 : शिखर धवनने पहिल्या सामन्यात रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या पाच षटकांत एक विकेट गमावत ८५ धावा केल्या. रसेल आणि रिंकू सिंग यांच्यात सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली. वेस्ट इंडिजच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने २५ चेंडूत नाबाद ६४ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात टी नटराजनने तीन तर मयंक मार्केंडेने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी पॅट कमिन्सनेही एक विकेट घेतली.