आयपीएल २०२५ चा अंतिम सामना पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ आयपीएलचे पहिले जेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. आरसीबीच्या प्रत्येक फलंदाजीने धावसंख्येत योगदान दिलं, पण मोठी खेळी करू शकला नाही. दरम्यान अर्शदीप सिंगने २० व्या षटकात भेदक गोलंदाजी करत सामना पंजाबच्या बाजूने वळवला.

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या आहेत. अहमदाबादच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी २०० अधिक धावांचं आव्हान महत्त्वपूर्ण होतं. पण आऱसीबीने अखेरच्या षटकांमध्ये ५ विकेट्स गमावल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. अर्शदीपच्या अखेरच्या षटकात तर पंजाब किंग्स सामन्यात पुढे असल्याचे दिसून आले.

अर्शदीप सिंगने ३ षटकांमध्ये ३७ धावा केल्या होत्या. पण अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजीसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्शदीपने आपल्या रेकॉर्डप्रमाणे कामगिरी केली. त्याने अखेरच्या षटकात एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही आणि ३ विकेट्स घेत फक्त ३ धावा दिल्या. यासह आऱसीबीचा संघ १०-२० धावा मागे पडला आहे.

अर्शदीप सिंगचं २०वं षटक – ३ विकेट्स ३ धावा

पहिला चेंडू – कृणाल पंड्या – १ धाव
दुसरा चेंडू – रोमारियो शेफर्ड – पायचीत
तिसरा चेंडू – भुवनेश्वर कुमार – १ धाव
चौथा चेंडू – कृणाल पंड्या – झेलबाद
पाचवा चेंडू – यश दयाल – १ धाव
सहावा चेंडू – भुवनेश्वर कुमार – झेलबाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीची सुरूवात फलंदाजीला चांगली झाली नव्हती. आरसीबीने पॉवरप्लेमध्येच फिल सॉल्टची विकेट गमावली. पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. तर मयंक अग्रवाल २४ धावा, रजत पाटीदार २६ धावा, लिव्हिंगस्टोन २५ धावा, जितेश शर्माने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली. यासह आरसीबीने २० षटकांत १९० धावा केल्या आहेत.