DC Vs CSK: ३१ मार्च म्हणजेच रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा सामना पार पडला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत १९१ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला १७१ धावाच करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी हा सामना गमावला. मात्र धोनीची खेळी चर्चेत राहिली.

माहीची खेळी प्रचंड चर्चेत

महेंद्र सिंग धोनीने रविवारी झालेल्या सामन्यात चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावांची नाबाद खेळी केली. माही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र त्याच्या खेळीने उपस्थितांची मनं जिंकली. फलंदाजीसाठी मैदानात येताच त्याने चौकार मारला.

माहीला चिअर करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा

ऋषभ पंतच्या नेतृत्वात ३१ तारखेचा सामना दिल्लीने जिंकला. तरीही या सामन्यात महेंद्र सिंग धोनीची क्रेझ पाहण्यास मिळाली. चेन्नईचा हा सामना पाहण्यासाठी आयेशा खान आली होती. शिवम दुबेची विकेट गेल्यावर जेव्हा धोनी मैदानावर आला तेव्हा जल्लोष झाला. या जल्लोषात आयेशा खान सहभागी झाली होती. तसंच ती धोनी-धोनी या घोषणा देत तिने धोनीला चिअर केलं. आयेशा खानच्या या जल्लोषाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आयेशा खान कोण आहे?

आयेशा खान ही अभिनेत्री, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर आहे. आयेशा खानने बिग बॉस १७ मधून तिची वेगळी ओळख निर्माण केली. कसौटी जिंदगी की मध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून तिने पदार्पण केलं. तसंच तेलुगूमध्ये मुखचित्रम या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२४ च्या १३ व्या क्रमांकाच्या सामन्यात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत १९१ धावा केल्या. त्यानंतर हे टार्गेट गाठण्यासाठी चेन्नईने प्रयत्न केले. धोनीने उत्तम खेळी केली. मात्र चेन्नईला १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.