Bhuvneshwar Kumar with RCB in IPL 2025 : भुवनेश्वर कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला आहे. आरसीबीने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवीला मूळ किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त किमतीत खरेदी केले. भुवनेश्वर १०.७५ कोटींना विकला गेला. तो एक धडाकेबाज वेगवान गोलंदाज आहे. त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. भुवनेश्वर यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.

मुंबई इंडियन्सने भुवनेश्वर कुमारवर पहिली बोली लावली. यानंतर लखनौ सुपर जायंट्सही त्यात सामील झाले. मुंबईने १०.२५ कोटींची शेवटची बोली लावली. त्यानंतर लखनौने १०.५० कोटींची शेवटची बोली लावली. मात्र, शेवटी आरसीबीने बाजी मारली. आरसीबीने भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. भुवीमुळे आरसीबीची गोलंदाजी अधिक मजबूत होईल.

भुवनेश्वरने घेतली मोठी झेप –

भुवी याआधी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आतापर्यंत प्रत्येक मोसमात तो हैदराबादकडूनच खेळला होता. हैदराबादने त्याला २०२४ मध्ये मानधन म्हणून ४.२० कोटी रुपये देत होते. पण आता त्याचे मानधन दुपटीने वाढले आहे. भुवनेश्वरला आता १०.७५ कोटी रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा – Bhuvneshwar Kumar : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीने या खेळाडूंवरही ओतला पैसा –

आरसीबीने जोश हेजलवूडवर खूप पैसा खर्च केला. हेजलवुड १२.५० कोटी रुपयांना विकले गेले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. जितेश शर्माची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मात्र आरसीबीने त्याला ११ कोटी रुपयांना खरेदी केले. जितेश हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. फिलिप सॉल्ट हा यष्टिरक्षक फलंदाजही आहे. आरसीबीने त्याला ११.५० कोटी रुपयांना खरेदी केले. आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी रुपयांना खरेदी केले