IPL 2024 Viral Video : सध्या भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलचा उत्साह पाहायला मिळत आहे. जसजसे संघ अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तसतसा क्रिकेटप्रेमींचा उत्साहही वाढतोय. आयपीएल २०२४ चे सामने खेळताना महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या मोठ्या खेळाडूंचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यात अलीकडेच आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकून आघाडीवर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत युजवेंद्र चहल सलमान खानच्या ‘वाँटेड’ चित्रपटातील राधेप्रमाणे आपला जलवा दाखवताना दिसतोय.

युजवेंद्र चहलचा जलवा

काल मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान आयपीएलमध्ये २०० विकेट पूर्ण करणाऱ्या युजवेंद्र चहलचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत आहेत. यावेळी स्पिनर युजवेंद्र चहलचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

युजवेंद्रचा हा मजेदार व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सलमान खानच्या चेहऱ्यावर युजवेंद्र चहलचा चेहरा अगदी क्रिएटिव्ह पद्धतीने लावण्यात आला आहे. यावेळी तो ‘वाँटेड’मधील राधेच्या भूमिकेत ‘तेरा ही जलवा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना राजस्थान रॉयल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” २०० आयपीएल विकेटचा जलवा.”

युजर्सनी युजवेंद्र चहलकडे केली ‘ही’ मागणी

युजवेंद्र चहलचा हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सला हसू आवरणे अवघड होईल, याचदरम्यान काही चाहते भारतीय क्रिकेटपटूला आयपीएलप्रमाणे टी-20 विश्वचषकातही आपला जलवा दाखवण्याची विनंती करत आहेत. एका युजरने लिहिले की, “भाई वर्ल्ड कपमध्येही तुझी ताकद दाखव.”

दुसऱ्या युजरने लिहिले, “गजब भावा, ज्यांनी एडिटिंग केले त्याला २१ तोफांची सलामी.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “हा तर खूप महागडा सलमान भाई.” युजवेंद्र चहलच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.