MS Dhoni Uses Trump Card For Shubman Gill : इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने धावांचा पाऊस पाडला आहे. शुबमनने या हंगामात सर्वाधिक धावा (८५१) केल्यामुळं तो ऑरेंज कॅप विनर बनला आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिडाविश्वातील चाहत्यांचं शुबमनवर विशेष लक्ष असणार आहे. मागील चार सामन्यात गिलने तीन शतक ठोकून इतिहास रचला आहे. परंतु, आज होणाऱ्या आयपीएलच्या फायनलच्या सामन्यात धोनीला एक ट्रम्पकार्ड खेळाडू आहे, जो शुबमनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.

मागील काही काळापासून दुखापतग्रस्त असलेल्या दीपक चहरने पुनरागमन करून गिलला बाद करण्यात यश मिळवलं आहे. चहरने गिलला ४७ चेंडूमध्ये तीनवेळा बाद केलं आहे. तर गिलने चहरच्या गोलंदाजीवर ६२ धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीला चहरकडून अप्रतिम गोलंदाजी करण्याची अपेक्षा असणार आहे. चहरने या आयपीएलमध्ये फायनलआधी फक्त ९ सामने खेळले आहेत. परंतु, हे सामने खेळून चहरने एकप्रकारे विश्वकपसाठी पूर्णपणे फिट असल्याचा मेसेज दिला आहे.

नक्की वाचा – ” त्याच्या गुणांनी मला…”; IPL फायनलआधी सचिन तेंडुलकरने शुबमन गिलवर उधळली स्तुतीसुमने, इन्स्टाग्राम पोस्ट Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिपकने खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ३० षटकांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. याचदरम्यान त्याच्या इकोनॉमी रेट ८.६३ चा आहे. दीपकला त्याच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करण्याची गरज निश्चितच आहे. पंरतु, त्याच्या गोलंदाजीचा जलवा मैदानात पाहायला मिळत आहे. त्याने ९ सामन्यांतच १२ विकेट्स घेतल्या आहेत. जर चहरने सर्व सामने खेळले असते, तर हे आकडे बदललेले पाहायला मिळाले असते. कदाचित चहरची पर्पल कॅप विनरच्या लिस्टमध्येही नोंद झाली असती.