पराभवाची वाट मागे टाकून विजयाच्या वाटेवर झोकात घोडदौड करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सची पाचवी लढत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर सोमवारी रंगणार आहे.
आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या आठव्या पर्वात सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर जीन पॉल डय़ुमिनीच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ कमालीचा सावरला. मग त्यांनी दोन सलग विजय मिळवत आपली कामगिरी रुळावर आणली.
तिसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे १६६ धावांचे लक्ष्य दिल्लीने लीलया पेलले. या सामन्यात सलामीवीर मयांक अगरवाल आणि अनुभवी फलंदाज युवराज सिंग यांनी अर्धशतके झळकावली, तर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध श्रेयस अय्यर आणि डय़ुमिनी यांनी अर्धशतके साकारली. गोलंदाजीतसुद्धा दिल्लीने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा लेग-स्पिनर इम्रान ताहीरने चार सामन्यांत ९ बळी घेतले आहेत. त्याला अमित मिश्राची तोलामोलाची साथ मिळत आहे . कोलकाताने मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आपला तीन सामन्यांतील दुसरा विजय साजरा केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
दिल्ली-कोलकाताची कोटलावर लढाई
पराभवाची वाट मागे टाकून विजयाच्या वाटेवर झोकात घोडदौड करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सची पाचवी लढत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर सोमवारी रंगणार आहे.
First published on: 20-04-2015 at 02:23 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi daredevils vs kolkata knight riders