Dream11 IPL 2020 UAE : सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने आज कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. २०१४मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला.
That’s that from Match 5 as the Mumbai Indians win by 49 runs.
Scorecard – https://t.co/xDQdI54h5N #KKRvMI pic.twitter.com/j58dPCYVQl
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020
प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात १ धाव काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. सौरभ तिवारी या सामन्यात लवकर झेलबाद झाला. त्याने २१ धावा केल्या. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. ५४ चेंडूंच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली.
A look at the Points Table after Match 5 of #Dream11IPL 2020. pic.twitter.com/zJjwGqErxE
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020
१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल (७) आणि सुनील नारायण (९) स्वस्तात बाद झाले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला आणि सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. पण राहुल चहरने कार्तिकला पायचीत पकडले. कार्तिकने २३ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा केल्या. कार्तिकपाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला नितीश राणादेखील (२४) बाद झाला. मुंबईचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह याने आंद्रे रसल (११) आणि इयन मॉर्गन (१६) यांना एकाच षटकात माघारी धाडले. यंदाच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू पॅट कमिन्स याने जसप्रीत बुमराहला चांगलाच चोप दिला. त्याने एकाच षटकात बुमराहला चार षटकार लगावले. १२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावांची तडाखेबाज खेळी करणारा पॅट कमिन्स फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यामुळे मुंबईला ४९ धावांनी विजय मिळवला.
२०१४मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता पण अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि मुंबईच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला.
१२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावांची तडाखेबाज खेळी करणारा पॅट कमिन्स फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
यंदाच्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू पॅट कमिन्स याने जसप्रीत बुमराहला चांगलाच चोप दिला. त्याने एकाच षटकात बुमराहला चार षटकार लगावले.
मुंबईचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. कोलकाताचे दोन धोकादायक फलंदाज आंद्रे रसल आणि इयन मॉर्गन यांना त्याने एकाच षटकात माघारी धाडले. रसलने ११ चेंडूत ११ धावा केल्या तर मॉर्गनने २० चेंडूत १६ धावा केल्या.
कार्तिकपाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला नितीश राणादेखील बाद झाला.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार दिनेश कार्तिकने राहुल चहरच्या गोलंदाजीचा समाचार घेण्याचा विचार केला, पण राहुलने कार्तिकला पायचीत पकडत कोलकाताला तिसरा धक्का दिला. कार्तिकने २३ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा केल्या.
कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला आणि सामन्यातील आव्हान जीवंत ठेवलं.
सातत्याने बाऊन्सर चेंडू टाकून सुनील नारायणच्या फटकेबाजीला लगाम लावण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. बाऊन्सरच्या जाळ्यात तो अडकला आणि झेलबाद झाला.
नव्या दमाचा सलामीवीर शुभमन गिल मोठा फटका मारताना झेलबाद झाला आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. अनुभवी ट्रेंट बोल्टने त्याला माघारी धाडलं.
मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९५ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची तुफानी खेळी केली. त्याने ६ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. कोलकातापुढे विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य आहे.
फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असणारा हार्दिक पांड्या 'हिट विकेट' झाला. स्वत:ची बॅट स्टंपला लागल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या.
कर्णधाराला साजेशी अशी खेळी करणारा रोहित शर्मा ८० धावांवर बाद झाला. ५४ चेंडूंच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले.
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी सुरूच असून मुंबई दोनशेपार मजल मारेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सौरभ तिवारी या सामन्यात लवकर झेलबाद झाला. १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत त्याने २१ धावा केल्या.
मुंबईकर रोहित शर्माने षटकारांची बरसात करत IPLमध्ये षटकारांचं द्विशतक पूर्ण केलं.
रोहितचं दमदार अर्धशतक, चौकार-षटकारांची बरसात
तुफान फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्याने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. त्याच जोरावर मुंबईने धडाकेबाज सुरूवात करत नवव्या षटकापर्यंत नव्वदी गाठली होती.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडीने तुफान फटकेबाजी करत सहाव्याच षटकात संघाला अर्धशतक गाठून दिलं. सुनील नारायणच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत मुंबईने पन्नाशी गाठली.
सूर्यकुमार यादवने संदीप वारियच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर त्याने चौकार लगावल्यावर दोन चेंडू निर्धाव गेले. पण त्यानंतर चौकारांची हॅटट्रिक करत सूर्यकुमारने षटक संपवलं.
पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला.
वाचा सविस्तर...
The first player to represent us in 150 @IPL games Take a bow, Polly #Polly150 #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #KKRvMI @KieronPollard55 pic.twitter.com/kphKMae6pV— Mumbai Indians (@mipaltan) September 23, 2020
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ पहिल्या सामन्यातही प्रथम फलंदाजीला उतरला होता. त्या सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले होते.