Dream11 IPL 2020 MI vs KXIP: पंजाबविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईच्या संघाने १९१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावाच करू शकला. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी २-२ बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळी करणाऱ्या कायरन पोलार्डला सामनावीर घोषित करण्यात आले.

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरूवात झाली. मयंक अग्रवाल २५ धावा करुन माघारी परतला. पाठोपाठ करूण नायर शून्यावर बाद झाला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या लोकेश राहुल मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. केएल राहुलने १७ धावांवर माघारी परतला. ३ गडी झटपट बाद झाल्यावर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी मोक्याच्या क्षणी आश्वासक फटकेबाजी करत चांगली भागीदारी केली. पूरन आणि मॅक्सवेल यांची जमलेली जोडी पॅटिन्सनने फोडली. दमदार फटकेबाजी करणारा पूरनने २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. पाठोपाठ मॅक्सवेलही मोठा फटका मारताना ११ धावांवर माघारी परतला. कृष्णप्पा गौतमने थोडीफार फटकेबाजी केली पण अखेर पंजाबला पराभवाला सामोरं जावं लागलं.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना फॉर्मशी झुंजणारा क्विंटन डी कॉक या सामन्यातही अपयशी ठरला. पहिल्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केलं. त्यानंतर चोरटी धाव घेताना सूर्यकुमार यादव १० धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना इशान किशन (२८) झेलबाद झाला. मुंबईच्या ‘हिटमॅन’ने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४८ चेंडूच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या-पोलार्डने तुफान फटकेबाजी केली. पोलार्डने २० चेंडूत ३ चौकार व ४ षटकार मारत नाबाद ४७ धावा केल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ३० धावा जमवल्या.

Live Blog

23:31 (IST)01 Oct 2020
IPL 2020: रोहित, पोलार्डची दमदार खेळी; मुंबईचा पंजाबवर सहज विजय

IPL 2020: रोहित, पोलार्डची दमदार खेळी; मुंबईचा पंजाबवर सहज विजय

23:04 (IST)01 Oct 2020
मुंबईची सामन्यावर पकड; पंजाबच्या डावाला गळती

मुंबईची सामन्यावर पकड; पंजाबच्या डावाला गळती

22:55 (IST)01 Oct 2020
मोठा फटका मारताना मॅक्सवेल माघारी

मोठा फटका मारताना मॅक्सवेल माघारी

22:48 (IST)01 Oct 2020
पंजाबची जमलेली जोडी फुटली; पॅटिन्सनला यश

पूरन आणि मॅक्सवेल यांची जमलेली जोडी पॅटिन्सनने फोडली. दमदार फटकेबाजी करणारा पूरनने २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या.

22:38 (IST)01 Oct 2020
पूरन-मॅक्सवेलची आश्वासक फटकेबाजी; सामन्यात रंगत

३ गडी झटपट बाद झाल्यावर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी मोक्याच्या क्षणी आश्वासक फटकेबाजी करत चांगली भागीदारी केली.

22:17 (IST)01 Oct 2020
राहुल चहरने उडवला केएल राहुलचा त्रिफळा

जबरदस्त फॉर्मात असलेल्या लोकेश राहुल मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. केएल राहुलने १७ धावांवर माघारी परतला.

22:05 (IST)01 Oct 2020
पंजाबची खराब सुरुवात, करुण नायर परतला माघारी

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन थेट स्टम्पवर

भोपळाही न फोडता करुण नायर माघारी

22:01 (IST)01 Oct 2020
पंजाबला पहिला धक्का, मयांक अग्रवाल माघारी

जसप्रीत बुमराहने फोडली पंजाबची जोडी, टप्पा पडून आत येणारा चेंडू थेट स्टम्पवर

२५ धावा करुन मयांक परतला माघारी

21:22 (IST)01 Oct 2020
रोहितचं अर्धशतक; पांड्या-पोलार्डची तुफान फटकेबाजी

पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने तुफान फटकेबाजी करत २० षटकात १९१ धावा केल्या. रोहित शर्माने संयमी अर्धशतकी खेळी केली. तर शेवटच्या षटकांमध्ये पांड्या आणि पोलार्ड जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने २० चेंडूत नाबाद ४७ धावा कुटल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या.

21:00 (IST)01 Oct 2020
रोहित शर्मा ७० धावांवर बाद

अर्धशतकानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादात रोहित शर्मा ७० धावांवर बाद झाला. त्याने ४८ चेंडूच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार खेचले.

20:48 (IST)01 Oct 2020
मुंबईच्या 'हिटमॅन'चं धमाकेदार अर्धशतक

डावाच्या सुरूवातीला अतिशय संयमी खेळी करणाऱ्या मुंबईच्या 'हिटमॅन'ने ४० चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं.

20:37 (IST)01 Oct 2020
फटकेबाजीच्या प्रयत्नात इशान किशन झेलबाद

संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना इशान किशन झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत २८ धावा केल्या.

20:24 (IST)01 Oct 2020
रोहित-इशानने सावरला मुंबईचा डाव

रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली.

19:50 (IST)01 Oct 2020
सूर्यकुमार धावचीत; मुंबईला दुसरा धक्का

फिरकीपटूच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना सूर्यकुमार यादव धावचीत झाला. मोहम्मद शमीने फेकलेला थ्रो थेट स्टंपवर लागला आणि सूर्यकुमार यादव १० धावांवर माघारी परतला.

19:41 (IST)01 Oct 2020
हिटमॅन @ ५,०००

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने IPLमध्ये अनोखा पराक्रम केला. ५,००० IPL धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या २ धावांची गरज होती. चौकार मारत त्याने हा पराक्रम केला.

19:33 (IST)01 Oct 2020
पहिल्याच षटकात डी कॉक त्रिफळाचीत

फॉर्मशी झुंजणारा क्विंटन डी कॉक या सामन्यातही अपयशी ठरला. पहिल्याच षटकात शेल्डन कॉट्रेलने त्याला शून्यावर त्रिफळाचीत केलं.

19:26 (IST)01 Oct 2020
पाहा दोन्ही संघ...
19:05 (IST)01 Oct 2020
पंजाबचे 'किंग्ज'

मुरूगन अश्विन संघाबाहेर... कृष्णप्पा गौतमला संधी!

19:04 (IST)01 Oct 2020
मुंबईची पलटण...

मुंबईच्या संघात कोणताही बदल नाही...

19:04 (IST)01 Oct 2020
नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी