आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडूंनी आता सरावाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोनाची लागण झाली होती. यामुळे संघाचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला होता. अखेरीस सर्व करोनाग्रस्तांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर चेन्नईने सरावाला सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीनेही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करायला सुरुवात केली आहे. याचसोबत धोनी संघातील आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शनही करतो आहे. चेन्नईचे खेळाडू सराव करत असतानाचा एक व्हिडीओ संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात धोनी आपल्या संघातील एका सहकाऱ्याला चिंता करु नको, DRS घेत नाहीये असं गमतीत म्हणून मस्करी करताना दिसत आहे. पाहा हा व्हिडीओ…
Net. Set. Go! #StartTheWhistles #Yellove #WhistlePodu pic.twitter.com/GD13SGs3x9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 7, 2020
DRS ची दाद मागण्यामध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं एक वेगळं नाव तयार केलं होतं. यष्टींमागे नेहमी सक्रीय असलेल्या धोनीला नेहमी DRS चा अचूक अंदाज यायचा. एखादा फलंदाज बाद असूनही ज्यावेळी पंच त्याला नाबाद ठरवायचे त्यावेळी धोनी DRS घ्यायचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या पंचांच्या पाहणीत तो फलंदाज बाद झालेला दिसून यायचा. अनेकांनी धोनीच्या या समयसूचकतेमुळे DRS चं नाव (Desion Review System) बदलून Dhoni Review System असंही ठेवलं होतं.
अवश्य वाचा – IPL Flashback : ज्यावेळी CSK हंगामाचा पहिला सामना खेळतं, त्यावेळी कशी राहिली आहे त्यांची कामगिरी??