Dushmantha Chameera Diving Catch Video: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दुश्मंता चमीराची चांगलीच चर्चा रंगली. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या दुश्मंता चमीराची गोलंदाजीत चांगलीच धुलाई झाली. दुश्मंता चमीराने या सामन्यात गोलंदाजी करताना अवघ्या ३ षटकात ४६ धावा खर्च केल्या. मात्र, क्षेत्ररक्षणात त्याने भरपाई करून काढली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याने हवेत डाईव्ह मारून सुपरमॅन स्टाईल झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. मिचेल स्टार्क गोलंदाजी करत असताना अनुकूल रॉय स्ट्राईकवर होता. स्टार्कने अनुकूल रॉयच्या पॅडवर चेंडू टाकला. या चेंडूवर अनुकूल रॉयने फ्लिक शॉट मारला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जात होता. इतक्यात दुश्मंता चमीरा धावत आला आणि डाईव्ह मारत सुपरमॅन स्टाईल झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण वेगाने जात असलेल्या चेंडूचा अंदाज घेऊन योग्यवेळी डाईव्ह मारणं आणि झेल टिपणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे स्टार्कनेही टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.

स्टार्कने एकाच षटकात घेतल्या ३ विकेट्स

या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कने कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना चांगलच बांधून ठेवलं. त्याने या षटकात गोलंदाजी करताना अवघ्या ९ धावा खर्च केल्या. या षटकातील पहिल्या चेंडूवर रसेलने षटकार खेचला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॉवेल एलबीडब्ल्यू होऊन माघारी परतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुकूल रॉय झेलबाद होऊन माघारी परतला. सलग २ गडी बाद केल्यानंतर स्टार्ककडे हॅट्रिक घेण्याची संधी होती. पाचव्या चेंडूवर रसेल धावबाद होऊन माघारी परतला.

कोलकाता नाईट रायडर्सने उभारला २०४ धावांचा डोंगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २०४ धावांचा डोंगर उभारला. कोलकाता नाईट रायडर्सकडून रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नरेनने दमदार सुरूवात करून दिली. गुरबाजने २६ धावा चोपल्या. तर सुनील नरेनने २७ धावा केल्या. या डावात अंगकृश रघुवंशीची बॅट चांगलीच तळपली. त्याने या डावात ४४ धावा चोपल्या. शेवटी रिंकू सिंगने गोलंदाजांचा समाचार घेत ३६ धावा चोपल्या आणि संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली.