Glenn Maxwell on Virat Kohli in T20 World Cup : आयपीएल २०२४ च्या हंगामानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेच आयोजन केले जाणार आहे. विराट कोहली या स्पर्धेसाठी भारतीय संघात सामील होणार की नाही, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आयपीएलच्या चालू मोसमातील कोहलीची कामगिरी पाहता हा भारतीय स्टार जूनमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत स्थान मिळवण्यात यशस्वी होईल, असे दिसते. तथापि, आयपीएलमध्ये आरसीबीकडून कोहलीबरोबर खेळणारा ग्लेन मॅक्सवेलला वाटते की टी-२० विश्वचषकासाठी कोहलीची भारतीय संघात निवड होऊ नये.

आमच्याविरुद्ध खेळलेली खेळी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक होती –

ईएसपीएनशी बोलताना ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, “विराट कोहली हा खूप चांगला खेळाडू आहे, त्याच्याविरुद्ध मी खेळलो आहे. तुम्ही त्याच्या कारकिर्दीकडे बघा, त्याचा टूर्नामेंटमधील रेकॉर्ड किती उत्कृष्ट आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान त्याने मोहालीमध्ये आमच्याविरुद्ध खेळलेली खेळी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. यामुळे संपूर्ण स्पर्धेचा चेहरामोहराच बदलून गेला.”

Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू
Hardik Pandya banned from 1st match of ipl 2025
IPL 2024 : BCCI ची हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई! पुढील हंगामातील पहिल्याच सामन्यात खेळण्यावर घातली बंदी
MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Sanju Samson broke Shane Warne's record
CSK vs RR : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी रचला इतिहास! शेन वॉर्नला मागे टाकत केला खास पराक्रम
Kohli Scores 600 Runs In IPL 2024 in PBKS vs RCB match
PBKS vs RCB : विराटने पंजाबविरुद्ध रचला इतिहास, IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Rajasthan Royals Owner Hit Ross Taylor In IPL 2011
IPL 2024 : राहुलच नाही तर रॉस टेलरही संघ मालकाच्या रोषाचा ठरलाय बळी, शून्यावर आऊट झाल्यानंतर उचलला होता हात
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत

विराट कोहलीच्या फ्लिकला जगात तोड नाही –

ग्लेन मॅक्सवेल पुढे म्हणाला, “विराट कोहली विसंगत असलेल्या खेळपट्टीवर वेगवेगळ्या भागात शॉट्स खेळत होता. त्याच्याकडे शेवटच्या क्षणी हाताची स्थिती बदलण्याची क्षमता आहे आणि तो टेबल टेनिसच्या बॅटप्रमाणे फ्लिक करतो. ही अशी गोष्ट आहे ज्याला जगात तोड नाही. त्याची सतर्कताही उत्कृष्ट आहे. कोहलीसोबत सराव करणे आणि त्याला पाहणे खूप छान आहे, पण मलाही त्याच्याविरुद्ध खेळावे लागते. त्यामुळे मला वाटते की भारताने कोहलीची निवड करु नये.”

हेही वाचा – LSG vs DC : दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क? ज्याने २९ चेंडूत झळकावलय शतक

विराट कोहलीचा फॉर्म आयपीएलमध्ये कायम –

आयपीएलमध्ये कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपताना दिसत असून त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. आयपीएलच्या चालू हंगामात त्याने सहा सामन्यांत ३१९ धावा केल्या आहेत. तो सध्या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मात्र, त्याच्या स्ट्राइक रेटवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा – LSG vs DC : डीआरएसवरून गोंधळ! ऋषभ पंतने अंपायरशी घातला वाद, रिप्लेमध्ये झाला खुलासा

ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद –

गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, आयपीएलच्या चालू मोसमात मॅक्सवेलची बॅट अजूनही शांत असून तो धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅक्सवेल खातेही न उघडता बाद झाला. मॅक्सवेल शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची त्याची आयपीएल कारकिर्दीतील ही १७वी वेळ होती. यादरम्यान त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा खाते न उघडता बाद होणारा तो खेळाडू आहे. या बाबतीत मॅक्सवेलने रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकशी बरोबरी साधली आहे.