Rishabh Pant Confusion on DRS with Umpire : आयपीएल २०२४ मधील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात लखनऊची सुरुवात खराब झाली आणि पॉवर प्लेमध्येच संघाने आपल्या दोन फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. याशिवाय डीआरएसबाबत सामन्यात पुन्हा एकदा गदारोळ झाला. याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत बराच वेळ मैदानावरील पंचांशी वाद घालताना दिसला.

डीआरएसवरून गदारोळ का झाला?

वास्तविक, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दिल्लीसाठी डावातील चौथे षटक टाकत होता. देवदत्त पडिक्कल त्याच्यासमोर फलंदाजी करत असताना इशांतचा एक चेंडू देवदत्तच्या लेग पॅडजवळून गेला, त्याला अंपायरने वाईड घोषित केले. त्यानंतर दिल्लीच्या बाजूने या चेंडूवर डीआरएस घेण्यात आला की हा चेंडू वाईड नाही आणि मैदानी पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. पण यानंतर पंत बराच वेळ मैदानी पंचांशी वाद घालताना दिसला.

Five players took RCB to playoffs
IPL 2024 : महिनाभर पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या RCB चा ‘विजयी’ षटकार, ‘या’ ५ खेळाडूंनी पालटले नशीब
Jitesh Sharma Punjab Kings New Captain for SRH against match
SRH vs PBKS : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार नियुक्त, शिखर-सॅमनंतर आता विदर्भाचा ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व
MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Virat Umpire's Verbal fight during RCB vs DC match
RCB vs DC : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, जाणून घ्या काय होतं नेमकं कारण?
MS Dhoni completes 250 sixes in IPL
GT vs CSK : धोनीने डिव्हिलियर्सच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Rohit Sharma Sad After Dismissal in MI vs SRH
मुंबई इंडियन्स विजयी पण रोहित शर्माचा ड्रेसिंग रूममधील Video पाहून चाहतेही दुःखी; कॅमेऱ्याने टिपले डोळ्यातील भाव
How Chennai Super Kings Qualify for Playoffs
IPL 2024: चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर ही आहेत समीकरणं

पंतचे म्हणणे होते की त्यांनी डीआरएस घेण्याबाबत कोणताही इशारा केला नाही. त्यामुळे तुम्ही डीआरएस थर्ड अंपायरकडे का जात आहात. यावर पंच म्हणताना दिसले की तू डीआरएस घेण्याचा इशारा केला होता. यानंतर जेव्हा रिप्लेमध्ये पाहण्यात आला, तेव्हा पंतने डीआरएससाठी इशारा केल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे दिल्लीला हा डीआरएसही गमवावा लागला. कारण चेंडू वाईडच होता.

हेही वाचा – LSG vs DC : दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क? ज्याने २९ चेंडूत झळकावलय शतक

आयुष बडोनीने सांभाळली लखनऊची धुरा –

लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य दिले. लखनऊची सुरुवात खराब झाली. मात्र आयुष बडोनीने डावाची धुरा सांभाळली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. बडोनीने ३५ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. अर्शद खान २० धावा करून नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. डी कॉकने १९ धावांची खेळी खेळली. स्टॉइनिस ८ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे लखनौने २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २० धावा देत ३ बळी घेतले. खलील अहमदने २ बळी घेतले. मुकेश कुमार आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक बळी घेतला.