scorecardresearch

Premium

IPL 2023: गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय; केन विल्यमसनच्या जागी ‘हा’ धडाकेबाज खेळाडू केला करारबद्ध

Kane Williamson out of IPL 2023: श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू दासुन शनाका लवकरच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. वास्तविक गुजरात जायंट्सने केन विल्यमसनच्या जागी त्याचा संघात समावेश केला आहे.

Dasun Shanaka to replace Kane Williamson
गुजरात संघ (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Dasun Shanaka to replace Kane Williamson for IPL 2023: आयपीएल २०२३ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायट्नस संघाने एक मोठी घोषणा केली. फ्रँचायझीने आयपीएल २०२३ साठी जखमी केन विल्यमसनच्या जागी श्रीलंकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार दासून शनाकाला करारबद्ध केले आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विल्यमसनला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याला फलंदाजीही करता आली नाही. केन नुकताच स्पर्धेतून बाहेर पडला असून तो मायदेशी परतला आहे.

शनाका याआधी कधीही आयपीएल खेळला नाही. त्याला ५० लाखांच्या मूळ किमतीसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. शनाकाने अलीकडेच भारत दौऱ्यावर फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. त्याने टी-२० मालिकेत १८७ च्या स्ट्राइक रेटने १२४ धावा केल्या होत्या. याच मालिकेत श्रीलंकेच्या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतकही झळकावले होते. शनाका हा एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने १८१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १४१.९४ च्या स्ट्राईक रेटने ३७०२ धावा केल्या आहेत. तसेच ८.८च्या इकॉनॉमी रेटने ५९ बळी घेतले.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

हेही वाचा – WPL 2024: आयपीएलचा ‘हा’ नियम पुढील वर्षी डब्ल्यूपीएलमध्ये लागू होणार, पण संघांची संख्या वाढणार नाही

विल्यमसनला दुखापत कशी झाली?

विल्यमसनला सीएसकेच्या डावाच्या १३व्या षटकात डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर झेल घेण्याचा प्रयत्न करताना दुखापत झाली. ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून षटकारासाठी जाणारा चेंडू रोखण्यासाठी त्याने उडी घेतली. विल्यमसनने षटकार जाणारा चेंडू सीमारेषेच्या आत फेकत दोन धावा वाचल्या. पंरतु या दरम्यान त्याच्या गुडघ्याल गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला मैदाना बाहेर नेण्यात आले. काही काळ उपचार करूनही तो अखेर न्यूझीलंडला उपचारासाठी परतला आहे.

दिल्लीने उभारली सन्मानजनक धावसंख्या –

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १६२ धावा केल्या. गुजरातला विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३२ चेंडूत ३७ तर उपकर्णधार अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. सरफराज खान ३० आणि अभिषेक पोरेलने २० धावा करून बाद झाले. १० पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी घातक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन विकेट मिळाल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gujarat titans have signed dasun shanaka to replace kane williamson for ipl 2023 vbm

First published on: 04-04-2023 at 22:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×