मुंबई इंडियन्सच्या खात्यावर पाच जेतेपदे आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सकडे एकही नाही. परंतु मुंबई, दिल्ली या दोन्ही संघांमध्ये अनेक विजयवीर खेळाडू आहेत. त्यामुळेच रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या लढतीत विजयी अभियानासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्स  सूर्यकुमारची उणीव

मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, किरॉन पोलार्ड आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा या प्रमुख फळीला कायम राखले आहे. याच चौघांच्या कामगिरीवर मुंबईची भिस्त असेल. लिलावात १५.२५ कोटी रुपयांची बोली लागलेल्या इशानसोबत सलामी करणार आहे, हे रोहितने आधीच स्पष्ट केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स  कर्णधार पंत सलामीला?

ऋषभ पंत दिल्लीची नेतृत्वधुरा कशी सांभाळतो, याकडे सर्वाचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघात रुजू झालेला नाही. त्यामुळे पंत व पृथ्वी शॉ सलामीला उतरू शकतील. विंडीजचा रोव्हमन पॉवेल, सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा सर्फराज खान, युवा संघाचा कर्णधार यश धूल यांच्यामुळे दिल्लीची फलंदाजी भक्कम झाली आहे.

’  वेळ : दुपारी ३.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league cricket mumbai indians delhi capitals akp
First published on: 27-03-2022 at 00:29 IST