वृत्तसंस्था, मुंबई

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील द्वंद्वाची पर्वणी चाहत्यांना आज, रविवारी अनुभवता येणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर क्रिकेटरसिकांचे लक्ष असेल.

Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”
manoj jarange patil loksabha election 2024
“यांना इतक्या ताकदीनं पाडा की…”, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!
Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

धोनीचा हा अखेरचा ‘आयपीएल’ हंगाम असण्याची शक्यता असून ऐतिहासिक वानखेडेवरील हा त्याचा अखेरचा सामना असू शकेल. याच मैदानावर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये श्रीलंकेला नमवत एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना धोनीने मारलेला षटकार आजही सर्व क्रिकेटचाहत्यांच्या लक्षात आहे. तो अशीच काही खास कामगिरी या सामन्यातही करेल अशी चाहत्यांना आशा असेल. वयाच्या ४२व्या वर्षीही धोनी उत्कृष्ट यष्टिरक्षण करत आहे. मात्र, फलंदाजीची त्याला फारशी संधी मिळालेली नाही. वानखेडेवरील बहुधा आपल्या अखेरच्या सामन्यात छोटेखानी का होईना, पण चाहत्यांना लक्षात राहील अशी खेळी करण्यास धोनीला निश्चित आवडेल.

हेही वाचा >>>Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO

मुंबई आणि चेन्नई हे ‘आयपीएल’मधील दोन सर्वांत यशस्वी संघ आहेत. या दोनही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच जेतेपदे मिळवली आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही संघांना सर्वाधिक ‘आयपीएल’ जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. यंदाच्या हंगामापूर्वी दोन्ही संघांना नवे कर्णधार लाभले. चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा धोनीकडून ऋतुराज गायकवाडकडे आली, तर रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पंड्या मुंबईचे कर्णधारपद भूषवत आहे.

चेन्नईच्या संघाने यंदा घरच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना चेपॉकवर खेळलेले तीनही सामने जिंकण्यात यश आले आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर त्यांची पाटी कोरी आहे. त्यांना दोन पराभव पत्करावे लागले आहेत. दुसरीकडे, मुंबईच्या संघाने हंगामाची सुरुवात तीन पराभवांसह केल्यानंतर गेल्या दोन सामन्यांत घरच्या मैदानावर खेळताना विजय मिळवले. आता मुंबईला पुन्हा घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

चेन्नईच्या गोलंदाजांची कसोटी

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. वानखेडेवरील सपाट खेळपट्टीवर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २३४ धावांचा डोंगर उभारला होता. तर गेल्या सामन्यात बंगळूरुने दिलेले १९७ धावांचे लक्ष्य मुंबईने १५.३ षटकांतच गाठले. यात सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत केलेल्या अर्धशतकाचाही समावेश होता. रोहित शर्मा आणि इशान किशन मुंबईला आक्रमक सुरुवात करून देत आहेत. त्यामुळे या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांची कसोटी लागेल. रवींद्र जडेजा आणि मुस्तफिझूर रहमान यांच्यावर चेन्नईच्या गोलंदाजीची भिस्त असेल.

हेही वाचा >>>PBKS vs RR : राजस्थानसाठी IPL पदार्पण करणारा कोण आहे तनुष कोटियन? ज्याने १०व्या क्रमांकावर झळकावलंय शतक

बुमराला अन्य गोलंदाजांची साथ गरजेची

मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पूर्ण लयीत आहे. गेल्या सामन्यात त्याने बंगळूरुविरुद्ध पाच गडी बाद केले होते. मात्र, मुंबईच्या अन्य गोलंदाजांनी त्याला साथ देणे गरजेचे आहे. जेराल्ड कोएट्झी (षटकामागे १०.५९ धावा) आणि आकाश मढवाल (१०.१६) हे वेगवान गोलंदाज महागडे ठरत आहेत. हार्दिक, शेफर्ड आणि मोहम्मद नबी या अष्टपैलू खेळाडूंनी गोलंदाजीत योगदान देणेही मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यांना आज ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि धोनीसारख्या फलंदाजांचा सामना करावा लागणार आहे.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप