क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीगच्या अकराव्या पर्वाला आजपासून (शनिवार) सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे या पर्वाच्याही दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात सिनेतारकांचा जलवा पाहायला मिळाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वरुण धवन, प्रभूदेवा, तमन्ना भाटिया, जॅकलिन फर्नांडिस, हृतिक रोशन या कलाकारांच्या नृत्याविष्काराने या सोहळ्याला सुरुवात झाली.

या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात वरुण धवनच्या डान्स परफॉर्मन्सने झाली. त्यानंतर प्रभूदेवा यांनीदेखील त्याला साथ दिली. वरूण आणि प्रभूदेवा यांच्यातील अफलातून जुगलबंदीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. तर दुसरीकडे जॅकलिन फर्नांडिस आणि तमन्ना भाटिया या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. यांसोबतच मिका सिंगच्या गाण्यांदरम्यान स्टेडियमवर उपस्थितांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला आणि हृतिकच्या जबरदस्त परफॉर्मन्सने या सोहळ्याच शेवट झाला.

सेलिब्रिटींच्या अफलातून डान्स परफॉर्मन्सनंतर उत्साही वातावरणात आयपीएलच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.