राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर चेन्नईच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यातही पराभव स्विकारावा लागला. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय स्वस्तात माघारी परतले. यानंतर ऋतुराज गायकवाडही धावबाद झाला.
अवश्य वाचा – IPL 2020 : गोलंदाजी आणि फलंदाजीत आमची कामगिरी चांगली होत नाहीये – धोनी
यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस जोडीने मधल्या षटकांत महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू या भागीदारीदरम्यान अपेक्षित धावगती न राखता आल्यामुळे चेन्नईवरचं दडपड वाढलं. आपल्या फलंदाजांचा संथ खेळ पाहून चेन्नई सुपरकिंग्जच्या ट्विटर हँडलनेही दाक्षिणात्य चित्रपटातील एका झोपलेल्या अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत खेळाडूंना ट्रोल केलं.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 25, 2020
अखेरच्या षटकांत केदार जाधव आणि डु-प्लेसिस माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले आणि दिल्लीने ४४ धावांनी सामन्यात विजय मिळवला.