आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला १६२ धावांवर रोखण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश आलं. नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी केलेली सुरुवात पाहता ही जोडी मुंबईला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत होतं. परंतू मधल्या षटकांमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन ठरलं. मुंबईच्या डावाला खिंडार पाडण्यात दक्षिण आफ्रिकेच्या लुन्गिसानी एन्गिडीने महत्वाची भूमिका बजावली.

एन्गिडीच्या पहिल्या दोन षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी धावा वसूल केल्या. पहिल्या दोन षटकांत एन्गिडीने एकही बळी न घेता २९ धावा दिल्या. मात्र यानंतर मधल्या षटकांमध्ये एन्गिडीने पुनरागमन करत २ षटकांत ९ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्या याच भेदक माऱ्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

पोलार्ड, कृणाल पांड्या आणि जेम्स पॅटिन्सन या फलंदाजांना एन्गिडीने माघारी धाडलं. एन्गिडीव्यतिरीक्त चेन्नईकडून दीपक चहर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ तर सॅम करन आणि पियुष चावला यांनी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – IPL 2020 : रोहितचा बळी आणि पियुष चावलाचं मानाच्या यादीत प्रमोशन