Dream11 IPL 2020 MI vs RR Live Updates: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ठोकलेल्या नाबाद ७९ धावांच्या बळावर मुंबईच्या संघाने राजस्थानला १९४ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याच्या पाठलाग करताना जोस बटलर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. बटलरने झुंजार ७० धावांची खेळी केली तर जसप्रीत बुमराहने २० धावांत ४ बळी टिपले. सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले.

रोहित शर्मा-क्विंटन डी कॉक जोडीने तुफान फटकेबाजी करत चांगली सुरूवात केली होती, पण डी कॉक २३ धावांवर बाद झाला. रोहितही ३५ धावा काढून माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर इशान किशनही बाद झाला. कृणाल पांड्याला लवकर फलंदाजीस पाठवण्यात आले, पण तो १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला. एकीकडे गडी बाद होताना सूर्यकुमार यादवने मात्र एक बाजू लावून धरत झुंजार अर्धशतक ठोकलं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या जोडीने शेवटपर्यंत तळ ठोकत मुंबईला १९३ धावांपर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमारने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का बसला. तीन सामन्यांनंतर संधी मिळालेला यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आल्यापासूनच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच नादात तो झेलबाद झाला. बुमराहने त्याला ६ धावांवर माघारी धाडलं. पाठोपाठ ट्रेंट बोल्टही भोपळा न फोडता तंबूत परतला. बटलर आणि लोमरोर यांच्यात चांगली भागीदारी होत असताना राहुल चहरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात लोमरोर बाद झाला. पण बटलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक केले. बटलर दमदार खेळ करत असताना पोलार्डने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बटलरने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावा केल्या. पण त्याच्यानंतर राजस्थानच्या संघाची धूळधाण उडाली आणि १३६ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ बळी टिपले.

 

Live Blog

23:20 (IST)06 Oct 2020
बुमराहचा बळींचा चौकार; मुंबईचा राजस्थानवर दणदणीत विजय

बुमराहचे २० धावांत ४ बळी; राजस्थान १३६ धावांत संघ गारद

22:53 (IST)06 Oct 2020
राजस्थानच्या संकटात वाढ; डावाला गळती

राजस्थानच्या संकटात वाढ; डावाला गळती

22:45 (IST)06 Oct 2020
पोलार्डने टिपला अप्रतिम झेल; बटलर माघारी

बटलर दमदार खेळ करत असताना पोलार्डने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बटलरने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७० धावा केल्या.

22:23 (IST)06 Oct 2020
महिपाल लोमरोर बाद, राजस्थानला चौथा धक्का

राहुल चहरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, बदली खेळाडू अनुकूल रॉयने घेतला सुरेख झेल

21:57 (IST)06 Oct 2020
राजस्थानच्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच, संजू सॅमसन बाद

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रोहित शर्माने घेतला सोपा झेल

भोपळाही न फोडता सॅमसन तंबूत परतला

21:46 (IST)06 Oct 2020
कर्णधार स्मिथ झेलबाद; बुमराहने काढला काटा

कर्णधार स्टीव्ह स्मिथ आल्यापासूनच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच नादात तो झेलबाद झाला. बुमराहने त्याला ६ धावांवर माघारी धाडलं.

21:39 (IST)06 Oct 2020
पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का; यशस्वी जैस्वाल बाद

१९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात राजस्थानला धक्का बसला. तीन सामन्यांनंतर संधी मिळालेला यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला.

21:29 (IST)06 Oct 2020
सूर्यकुमारचं दमदार अर्धशतक; राजस्थानला १९४ धावांचं लक्ष्य

राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने २० षटकात १९०चा आकडा पार केला. सूर्यकुमार यादवने ठोकलेल्या नाबाद ७९ धावांच्या बळावर मुंबईच्या संघाने ४ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली आणि राजस्थानच्या संघाला १९४ धावांचे लक्ष्य दिले.

20:56 (IST)06 Oct 2020
सूर्यकुमार यादवचे झुंजार अर्धशतक

एकीकडे गडी बाद होताना सूर्यकुमार यादवने मात्र एक बाजू लावून धरत झुंजार अर्धशतक ठोकलं.

20:47 (IST)06 Oct 2020
कृणाल पांड्या माघारी; मुंबईला चौथा धक्का

३ गडी झटपट बाद झाल्याने कृणाल पांड्याला लवकर फलंदाजीस पाठवण्यात आले पण तो १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला.

20:27 (IST)06 Oct 2020
श्रेयस गोपालचे २ चेंडूत २ बळी; रोहित, किशन माघारी

सूर्यकुमार यादवसोबत चांगली भागीदारी करत असताना रोहित शर्मा बाद झाला. श्रेयस गोपालने त्याला झेलबाद केले. रोहितने २३ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर इशान किशन पहिल्या चेंडूवर बाद झाला. श्रेयस गोपालने २ चेंडूत २ बळी टिपले.

19:57 (IST)06 Oct 2020
डी कॉक बाद; IPLच्या पहिल्याच षटकात कार्तिक त्यागीला यश

रोहित शर्मा - क्विंटन डी कॉक जोडीने तुफान फटकेबाजी करत चांगली सुरूवात केली होती, पण पदार्पणाचा सामना खेळणारा कार्तिक त्यागी याने IPLच्या पहिल्याच षटकात डी कॉकला बाद केलं. डी कॉकने १५ चेंडूत २३ धावा केल्या.

19:26 (IST)06 Oct 2020
दोन्ही संघ म्हणतात.... है तय्यार हम!
19:06 (IST)06 Oct 2020
राजस्थानच्या संघात तीन महत्त्वाचे बदल...

नव्या दमाच्या कार्तिक त्यागीला IPL पदार्पणाची संधी...

19:06 (IST)06 Oct 2020
मुंबईची पलटण...

मुंबईच्या संघात कोणताही बदल नाही!

19:05 (IST)06 Oct 2020
नाणेफेक जिंकून मुंबईची पहिली फलंदाजी

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजस्थानच्या संघात मात्र तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.