चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनी २१७ धावांचं आव्हान असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. चेन्नईला या सामन्यात १६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, केविन पिटरसन यासारख्या खेळाडूंनी धोनीच्या रणनितीवर टीका केली होती. संघाला गरज असताना धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉजनेही धोनीच्या रणनितीवर टीका केली आहे.

अवश्य वाचा – धोनीची शैली इतर कर्णधारांपेक्षा वेगळी, प्रत्येकवेळी स्वतःला प्रमोट करणं म्हणजे नेतृत्व करणं नाही !

“मला धोनीमध्ये अजिबात आत्मविश्वास असल्याचं दिसलं नाही. सामन्यात मोक्याच्या क्षणी संघाला जिथे त्याची गरज होती तिकडे तो उपलब्ध नव्हता कारण तो स्पर्धेसाठी तयार असल्याचं दिसलं नाही. माझ्या दृष्टीने या रणनितीमुळे संघातील खेळाडूंना कोणताही आत्मविश्वास मिळणार नाही. संघात रैना, हरभजन यासारखे महत्वाचे खेळाडू नसताना धोनीचं असं वागणं समजत नाही. रैना-हरभजन संघात असते तर ते थोडी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकले असते.” ब्रॅड हॉग आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होता.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही नाणेफेक जिंकत धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चाहते तुला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाहू इच्छित आहेत..असा प्रश्न विचारला असता ज्यावेळी संघाला गरज असेल त्यावेळी मी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येईन असं धोनीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – IPL 2020 : प्रत्येकाला वाटतं धोनीने मैदानात येऊन पूर्वीसारखं खेळावं, पण…