बहुप्रतिक्षित IPL 2020 साठी २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी BCCIने दिली. मुंबईचा संघही युएईला रवाना झाला. युएईला जाणाऱ्या अनेक खेळाडूंनी मास्क आणि पीपीई कीट परिधान केले होते. त्यामुळे काही खेळाडू ओळखूदेखील आले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर २०१९ आणि २०२० असे दोन फोटो पोस्ट करण्यात आल्याने त्यापैकी काही खेळाडू कोण आहेत कळू शकलं. पण आता यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवीन जर्सी तयार करून घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीचे फोटो सध्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसत आहेत.
पाहा झलक-
BLUE. GOLD. AALA RE!!!
The wait is over. Paltan, here’s our official jersey for #Dream11IPL!
Pre-order on: https://t.co/14Jd096jBN#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @hydroman_333 @thesouledstore pic.twitter.com/4eKZYWjQPV
— Mumbai Indians (@mipaltan) August 30, 2020

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला होता. मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या लाइव्हवर कमेंट्स केल्या. त्यात एका चाहत्याच्या कमेंट्स फारच आकर्षक ठरल्या. त्याचं कारण तो चाहता होता अभिनेता रणवीर सिंग. रणवीरने एखाद्या सामान्य चाहत्याप्रमाणे लाइव्ह चॅटदरम्यान तब्बल तीन कमेंट्स केल्या. मुंबई इंडियन्सने त्याच्या कमेंट्सचा एक छान फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
दरम्यान, रोहित शर्मा आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह युएईला रवाना झाला आहे. मुंबईचा संघ दुबईतील पंचतारांकित सेंट रेजिस सादियात आईसलँड रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहे. दुबईतील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी हे एक हॉटेल आहे. तिथला एक व्हिडीओ रोहितने पोस्ट केला होता. या व्हिडीओत रोहित आणि पत्नी रितिका दोघेही तंदुरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट करताना दिसले.