जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुमारे ४ महिन्यांचा काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. अनेक महत्वाच्या स्पर्धा करोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आला. मात्र खेळाचं होत असलेलं नुकसान आणि क्रिकेट बोर्डांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली. मात्र यासाठी आयसीसीने काही महत्वाचे नियम आखून दिले. ज्यात विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. सध्या युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीही हा नियम लागू आहे.

परंतू राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यादरम्यान राजस्थानच्या रॉबिन उथप्पाने हा नियम मोडला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्यात रॉबिन उथप्पाने अनावधानाने चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर केला. पाहा हा व्हिडीओ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यात आल्यास आयसीसीने खेळाडूंवर कारवाईसाठी कडक नियम तयार केला आहे. “खेळाडू किंवा गोलंदाज चेंडूला लाळ किंवा थुंकी लावताना आढळल्यास पंच त्याला पहिल्यांदा ताकीद देऊ शकतात. परंतू यानंतरही हा प्रकार थांबला नाही तर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा बहाल करण्यात येतील. याचसोबत पंच तो बॉल वापरता येण्याआधी सॅनिटाईज करुन घेतील.” दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल IPL किंवा BCCI कडून अद्याप कोणंतही स्पष्टीकरण आलेलं नाही. दरम्यान यूवा खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकात्याने ३७ धावांनी सामना जिंकत राजस्थानचा विजयरथ रोखला आहे.