आयपीएल 2021मध्ये आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ मुंबईच्या वानखेडे मैदानावर आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागल्यानंतर संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सॅमसनला हा निर्णय चांगलाच महागात पडला. पंजाबकडून लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी करत राजस्थानसमोर 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला.
पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने 50 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकरांसह 91 धावांची खेळी केली. राहुल शेवटचे 4 चेंडू उरले असताना बाद झाला. आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या चेतन साकारियाने त्याला राहुल तेवतियाकरवी झेलबाद केले. तेवतियाने प्रंसगावधान राखत केएल राहुलचा सीमारेषेवर जबरदस्त झेल टिपला.
#RRvPBKS What a Catch Rahul Tewatia #Rahulttewatia pic.twitter.com/WLp6pwuB2c
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Yash Manglani (@YashManglani17) April 12, 2021
दीपक हुड्डाची वादळी खेळी
ख्रिस गेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी करत राहुलसोबत 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीनंतर हुड्डाने 20 चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण केले. राहुल-हुड्डाने 18व्या षटकात आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. अवघ्या 45 चेंडूत या दोघांनी शतकी भागीदारी उभारली. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात मॉरिसच्या गोलंदाजीवर हुड्डा बाद झाला. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 64 धावांची वादळी खेळी केली.