विराट कोहली नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.आयपीएल २०२१ मध्ये विराटच्या बंगळुरु संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिला सामन्यात बंगळुरुने मुंबईला पराभूत केलं. तर दूसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभवाची चव चाखली. या दोन विजयांसह बंगळुरुचा संघ ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स शेअर होताना दिसत आहेत. विश्वास बसत नसल्याचं सांगत मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. हे मीम्स पाहून विराट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना हसावं की रडावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.


२००८ सालापासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु एकही चषक जिंकलेला नाही. मागच्या पर्वात विराटच्या बंगळुरु संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे यंदा तरी विराटचा संघ आयपीएल चषक आपल्या नावावर करेल का असा प्रश्न चाहते विचारत आहे.