आयपीएल २०२२ मध्ये, शुक्रवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये राजस्थानने १५ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दरम्यान, नो-बॉलच्या वादाला खतपाणी घालण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल आयोजकांनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अडथळा आणल्याबद्दल दंड ठोठावला आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनाही दंड ठोठावण्यात आला, जे सामन्यादरम्यान मैदानावर गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतला सामन्याच्या शुल्काच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पंतने आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत कलम २.७ च्या लेव्हल २ चे उल्लंघन केल्याचा आरोप मान्य केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने या सामन्यात ऋषभ पंतलाही साथ दिली आणि कलम २.८ च्या लेव्हल २ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. ठाकूरनेही त्यांची शिक्षा मान्य केली आहे.

त्याच वेळी, आयपीएल आचारसंहिता मोडल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाजी प्रशिक्षका प्रवीण आम्रे यांना मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्रवीण आम्रेंवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. सामना थांबवण्यासाठी प्रवीण आम्रे मैदानात दाखल झाला होता. त्यांनी कलम २.२ च्या लेव्हल २ चा आरोप मान्य करून शिक्षा स्वीकारली आहे.

ऋषभ पंत आणि दिल्लीच्या संघाला राग का आला?

डावाच्या शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी सहा चेंडूत ३६ धावांची गरज होती. आतापर्यंत फॉर्ममध्ये नसलेल्या रोव्हमन पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. मात्र या षटकातील तिसऱ्या चेंडूवरून वाद सुरू झाला. मॅकॉयने तिसरा चेंडू फुल टॉस टाकला. ज्याबाबत दिल्लीच्या खेळाडूंनी सांगितले की, हा नो बॉल आहे. मैदानावरील अंपायरने या चेंडूला नो बॉल दिला नाही आणि वाद सुरू झाला. दिल्लीच्या खेळाडूंनी हा निर्णय टीव्ही अंपायरकडे तपासून घेण्याची मागणी केली पण अंपायने ती मान्य केली नाही. यानंतर या प्रकरणाला वेग आला. मैदानावर कुलदीपने चहलशी बोलण्यास सुरुवात केली. मैदानाबाहेर असताना कर्णधार ऋषभ पंतसह दिल्लीचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यासाठी ठाम होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 dc vs rr bcci fined rishabh pant shardul thakur and praveen amre abn
First published on: 23-04-2022 at 15:50 IST