आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. शेवटच्या षटकापर्यंत ताणलेला हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी विजय झाला. या विजयासाठी गोलंदाज डॅनियल सॅम्सने चांगली कामगिरी केली. शेवटच्या षटकात ९ धावांची गरज असताना त्याने सहा चेंडूंमध्ये फक्त ४ धावा दिल्या. परिणामी गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातला मात्र १७२ धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रोहित शर्माचा नाद करायचा नाय! गुजरातविरोधात खेळताना केली ‘ही’ अनोखी कामगिरी, मुंबईसाठी…

मुंबई इंडियन्सने विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर गुजरात टायटन्सने धमाकेदार फलंदाजी केली. मुंबईला पहिल्या विकेटसाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. सलामीला आलेल्या वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी १०६ धावांची भागेदारी केली. वृद्धीमान साहाने ४० चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या. तर शुभमन गिलने ३६ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर मात्र मुंबईने दिलेले आव्हान गाठताना गुजरातची धांदल उडाली. संघाच्या १३८ धावा झालेल्या असताना गुजरातचा तिसरा फलंदाज साई सुदर्शनच्या रुपात बाद झाला. सुदर्शनने १४ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या हार्दिक पांड्याने गुजरातचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र २४ धावांवर तो धावबाद झाला.

हेही वाचा >>> IPL 2022, RCB vs CSK : मोईन अलीने घातला खोडा, क्लीन बोल्ड झाल्यामुळे विराट कोहलीचं स्वप्न राहिलं अधुरं

त्यानंतर १२ चेंडूंमध्ये २० धावांची गरज असताना गुजरातचा फिनिशर म्हणून ओळख असलेला राहुल तेवतिया मैदानात आला. मात्र तोदेखील चांगली कामगिरी करु शकला नाही. तीन धावांवर असताना तो धावाबाद झाला. तेवतिया बाद झाल्यानंतर गुजरातला तारण्यासाठी राशिद खान (नाबाद) आला. पण तोदेखील चांगली कामगिरी करु शकला नाही. शेवटी गुजरात टायटन्सला वीस षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी मुंबईने गुजरातवर पाच धावांनी मात केली.

हेही वाचा >>> ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये, जाणून घ्या IPL 2022 मधील वेगळं समीकरण

यापूर्वी गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानतंर सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. सलामीला आलेल्या इशान किशन आणि रोहित शर्मा या जोडीने ७४ धावांची भागिदारी केली. ही जोडी आणखी धावा करेल असे वाटत असताना आठव्या षटकात रोहित शर्मा पायचित झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला सूर्यकुमार यादवदेखील मैदानावर तग धरू शकला नाही. त्याने अवघ्या १३ धावा केल्या. त्यानंतर मुंबईचे सर्वच फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले. इशान किशनने २९ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. त्यानंतर अलझारी जोसेफच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

हेही वाचा >>> IPL 2022 : विरेंद्र सेहवागचं CSK बद्दल मोठं विधान; म्हणाला ‘हा’ निर्णय चुकीचा होता

तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या तिलक वर्मानेही (२१) समाधानकारक धावा केल्या. इशान किशन बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला किरॉन पोलार्ड चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या चार धावांवर त्रिफळाचित झाला. शेवटी टीम डेव्हिडने मोठी फटकेबाजी करत २१ चेंडूंमध्ये ४४ धावा करुन संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं. मुंबई इंडियन्सने वीस षटके संपेपर्यंत १७७ धावा केल्या.

हेही वाचा >>> बंगळुरु-चेन्नई सामन्यात प्रेमाचा बहर, तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ

गोलंदाजी विभागात आज चांगला खेळ पाहायला मिळाला नाही. गुजरात टायटन्सला वीस षटकात मुंबईचे सहा गडी बाद करता आले. राशिद खानने रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या रुपात दोन बळी घेतले. तर अलझारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्यूसन या जोडीने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर मुंबई इंडियन्सचे गोलंदाजही गुजरातच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. मुरुगन अश्विनने वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या सलामीच्या फलंदाजांना बाद केलं. किरॉन पोलार्डने एक बळी घेतला. तर पोलार्डच्याच चेंडूवर साई सुदर्शन स्टंप्सला बॅट लागल्यामुळे बाद झाला. आजच्या सामन्याचा हिरो डॅनियल सॅम्स ठरला. त्याने शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करत गुजरातच्या हातातून विजय खेचून आणला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 gt vs mi mumbai indians won by five runs defeated gujarat titans prd
First published on: 06-05-2022 at 23:47 IST