IPL 2022, GT vs RCB Match Updates : आयपीएल २०२२ चा ४३ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातने बेंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. गुजरातच्या खात्यात आता १६ गुण झाले आहेत. त्यामुळे गुजरातच्या संघाने आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले होते. प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करताना बंगळुरू संघाने महिपाल लोमरोरला संधी दिली आहे. गुजरातने दोन बदल करत प्रदीप सांगवान आणि साई सुदर्शन यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

hardik pandya
कामगिरी उंचावण्याचे ध्येय! मुंबई इंडियन्सचा आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना
shashank singh
PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार
indians captain hardik pandya video with his son agastya during ipl ad shoot
हार्दिक पंड्याने लेकाला दिले अभिनयाचे धडे; शुटिंगमधील धमाल VIDEO शेअर करताच चाहते म्हणतात, “वॉव…”
ipl 2024 kavya maran angry on batsam after wicket fall viral video
VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १८ षटकांत चार गडी गमावून १७२ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस चार चेंडूत खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरात टायटन्समध्ये आगमन झालेल्या प्रदीप सांगवानने फॅफला झेलबाद केले.

गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. वृद्धीमान साहा २९  धावा करून बाद झाला. शुभमन गिलने ३१, साईने २० आणि कर्णधार हार्दिक पंड्या तीन धावा करून बाद झाला. मात्र, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियाने काम पूर्ण केले. तेवतिया ४३ आणि मिलर ३९ धावांवर नाबाद परतले.

दरम्यान, विराट कोहलीने आयपीएल २०२२ च्या हंगामात पहिले अर्धशतक झळकावले आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. मोहम्मद शमीच्या १३ व्या षटकात कोहलीने तिसऱ्या चेंडूवर धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले.