स्टार फलंदाज इशान किशनला आयपीएल २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने १५,२५ कोटी रुपयांची भरघोस रक्कम देऊन पुन्हा संघात घेतले. मुंबईचा स्टार फलंदाज असणाऱ्या इशान किशनने हंगामाच्या सुरुवातीला काही सामन्यांमध्ये वेगवान फलंदाजी केली. पण त्याला आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही आणि त्यामुळे त्याला आपल्या फलंदाजीने मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लिलावात मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे त्याच्या खेळावर परिणाम झाल्याचा खुलासा आता या डावखुऱ्या फलंदाजाने केला आहे. मात्र, लिलावानंतर काही दिवसांपर्यंत प्राईज टॅगचा दबाव राहील. पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी आणि खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे त्याने म्हटले आहे.

ड्रेसिंग रुममध्ये अनुभवी खेळाडूंची उपस्थिती आणि विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंशी बोलणे यामुळे त्याला प्राईज टॅगच्या दबावावर मात करण्यास मदत झाल्याचे इशान किशनने सांगितले. “प्राईज टॅगचा दबाव तुमच्यावर जास्तीत जास्त १-२ दिवस राहतो. परंतु या टप्प्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की तुम्ही अशा गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही आणि मला फक्त माझ्या संघाला जिंकण्यास कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्राईज टॅगचा दबाव निश्चितपणे काही दिवस टिकेल, पण जेव्हा तुमच्या आजूबाजूला असे चांगले वरिष्ठ असतील, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत राहता तेव्हा त्याचा फायदा होतो,” असे इशान किशन म्हणाला.

hardik pandya
कामगिरी उंचावण्याचे ध्येय! मुंबई इंडियन्सचा आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना
shashank singh
PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार
indians captain hardik pandya video with his son agastya during ipl ad shoot
हार्दिक पंड्याने लेकाला दिले अभिनयाचे धडे; शुटिंगमधील धमाल VIDEO शेअर करताच चाहते म्हणतात, “वॉव…”
ipl 2024 kavya maran angry on batsam after wicket fall viral video
VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन

“म्हणून, रोहित (शर्मा), विराट भाई (विराट कोहली) आणि हार्दिक भाई (पंड्या) यांसारख्या अनेक वरिष्ठांनी सांगितले की मी प्राईजच टॅगबद्दल विचार करू नये, कारण ती मी मागितलेली गोष्ट नाही. जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर त्यांनी ते केले आहे,” असे इशान पुढे म्हणाला.

‘प्राईज टॅगबद्दल विचार करण्याऐवजी, मी माझा खेळ कसा सुधारेल आणि त्या झोनमध्ये कसे राहायचे याचा अधिक विचार करतो. मला वरिष्ठांशी संवाद साधून मदत झाली. कारण ते सर्व त्या टप्प्यातून गेले आहेत आणि मला जे वाटत होते त्यांनीही ते अनुभवले आहे. मला खूप हलके वाटले. मी प्राईज टॅगबद्दल विचारही करत नाही. माझ्यासाठी ते दुय्यम आहे. तुम्ही फॉर्ममध्ये नसतानाही, तुम्ही इतर खेळाडूंना पुढे जाण्यासाठी कशी मदत करू शकता याचा विचार केला पाहिजे,” असेही इशान किशन म्हणाला.