आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात पंजाबचा संघ कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पुरता ढासळला. पंजाबचा भानुका राजपक्षे आणि शेवटी कसिगो रबाडा वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नोही. त्यातही केकेआरच्या उमेश यादवने चार गडी बाद केल्यामुळे पंजाबचा संघ १३७ धावांवर बाद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्याच षटकात उमेशने मयंकला तंबुत पाठवलं

नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पंजाब संघ फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र पहिल्याच षटकात उमेश यादवे आपली जादू दाखवत मयंक अग्रवालने अवघी एक धावा केलेली असताना त्याला पायचित केले. त्यानंतर मैदानावर पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लिआम लिव्हिंग्स्टोनलाही उमेश यादवेन अवघ्या १९ धावांवर तंबूत परत पाठवले. त्यानंतर पंजाबचा संघ १०२ धावांवर असताना पुन्हा एकदा उमेशने भेदक मारा करत हरप्रीत ब्रारचा त्रिफळा उडवला. हरप्रीत अवघ्या १४ धावांवर बाद झाल्यामुळे पंजाब संघ खिळखिळा झाला. त्यानंतर उमेश यादवने पुन्हा एकदा पंधरावे षटक टाकण्यासाठी चेंडू घेतला. यावेळीदेखील उमेशने जादुई गोलंदाजी करत राहुल चहरला झेलबाद केले. राहुल चहर शून्यावर असताना त्याचा नितिश राणाने त्याचा झेल घेतला.

उमेश यादवने आजच्या सामन्यात चार बळी घेतले. उमेशच्या या गोलंदाजीची केकेआरला चांगलीच मदत झाली. उमेश यादवसोबतच केकेआरच्या अन्य गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. टीम साऊथीने दोन बळी घेतले. तर शिवम मावी, सुनिल नरेन, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 pbks vs kkr kolkata knight riders bowlers umesh yadav taken four wickets prd
First published on: 01-04-2022 at 21:41 IST