दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा आठ गडी राखून पराभव केला आहे. मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने १८.१ षटकांत २ बाद १६१ धावा करून सामना जिंकला आहे. मात्र दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पृथ्वी शॉची प्रकृती अजूनही बरी नसून त्याला तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यापूर्वी पृथ्वी शॉने त्याच्या सोशल मीडियावर एक अपडेट देत याबाबत माहिती दिली. शॉने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हॉस्पिटलमधील त्याचा फोटो शेअर केला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही उपस्थित नसल्याने चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बुधवारी नाणेफेक दरम्यान, कर्णधार ऋषभने शॉच्या तब्येतीची कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी खुलासा केला की युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानची फलंदाजी सुरु असताना समालोचकांनी प्रशिक्षक रिकी पॉटिंग यांना पृथ्वी बाबत प्रश्न विचारला होता. त्यावर पॉटिंग यांनी पृथ्वीने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वीच पृथ्वीने त्याचा रुग्णालयाती फोटो शेअर करत, मी रुग्णालयात दाखल झालो आहे आणि तापातून झपाट्याने बरा होत आहे. तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी धन्यवाद. मी लवकरच परत येईन, असे म्हटले होते. मात्र आता मुख्य प्रशिक्षकांनीच पृथ्वीच्या पुनरागमनबाबत सर्व शक्यता फेटाळल्या आहेत.