इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५व्या हंगामापूर्वी, काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२२ मेगा लिलावानंतरच कॅटिच यांनी फ्रेंचायझीकडे राजीनामा सादर केला. बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसांच्या लिलावात पूर्वनिर्धारित योजनांना बगल दिल्याने कॅटिच यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

गेल्या मोसमात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वांच्या निशाण्यावर आला आहे. त्यानंतर ट्रेवर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनीही आपली पदे सोडली आहेत. आता टॉम मूडी संघाचे प्रशिक्षक असतील. स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला हैदराबाद संघात न घेतल्याने सायमन कॅटिच खूप नाराज झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – VIDEO : याच्यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं..! ‘त्या’ रनआऊटनंतर हरमनप्रीत कौरवर नेटकरी खवळले; तुम्हीच पाहा!

गतवर्षी सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब होती. मागील वर्षी त्यांनी १४ सामने खेळले, त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले. सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तळाशी होता. डेव्हिड वॉर्नरचे कर्णधारपद स्पर्धेच्या मध्यावर काढून घेण्यात आले. याशिवाय वॉर्नरला अनेक सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२२ मेगा लिलावामध्ये, सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडीजचा विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनला १०.७५ कोटींमध्ये जोडले. या फ्रेंचायझीने वॉशिंग्टन सुंदरला ८.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. रोमारियो शेफर्ड, टी नटराजन, एडन मार्कराम, मार्को यान्सन, सीन अॅबॉट, राहुल त्रिपाठी आणि ग्लेन फिलिप्स यांना लिलावात हैदराबादने पसंती दिली.